• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हॉटेलमध्ये तीन तरुणींसोबत काँग्रेसचा नेता पकडला, अय्याशी करतानाच…

August 24, 2026 by admin Leave a Comment


काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील गुना येथील एका हॉटेलात काँग्रेसचा एक नेता काही तरुणींसोबत पकडला गेला. राजगड जिल्ह्यातील ब्यावरा ब्लॉक काँग्रेसचा अध्यक्ष राहुल दांगीला अय्याशी करताना रंगेहाथ पकडल्यानंतर त्याला तात्काळ पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. मध्यप्रदेश काँग्रेस संगघटनेचे प्रभारी महासचिव संजय कामले यांनी एक आदेश काढून दांगीला पक्षातून काढण्यात आल्याचं जाहीर केलं आहे. तसेच अशा प्रवृत्तीचा आम्ही विरोध करत असल्याचंही कामले यांनी म्हटलं आहे.

अशा प्रकारच्या विकृतींना पक्षात कोणतंही स्थान नाहीये. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जीतू पटवारी यांच्या निर्देशानुसार राहुल दांगी यांना तात्काळ प्रभावाने पक्षातून पदमुक्त करण्यात आलं आहे. त्याची प्राथमिक सदस्यताही रद्द करण्यात आली आहे, असं संजय कामले यांनी स्पष्ट केलं.

चार तरुण, तीन तरुणी

राहुल दांगीसहीत चार लोकांना शनिवारी चांचौडा पोलीस ठाणे क्षेत्रातील बीनागंज येथील एका हॉटेलात तीन मुलीसहीत पकडलं होतं. पोलिसांना याबाबतची टीप मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. तीन मुली वयस्क होत्या. त्यामुळे कोणतीही तक्रार न मिळाल्याने त्यांना तहसीलमध्ये उभं करण्यात आलं. तिथे जामीन मिळाल्यावर त्यांना सोडून देण्यात आलं.

काय आहे प्रकरण?

शनिवारी पोलिसांनी बीनागंज येथील हॉटेलवर छापा मारल्याने खळबळ उडाली होती. शनिवारी संध्याकाळी हॉटेल राज पॅलेसमध्ये ही छापेमारी करण्यात आली. पोलिसांच्या मते, त्यांना दुपारी 4 वाजता सूचना मिळाली होती. या हॉटेलात अनैतिक धंदे सुरू असल्याचं कळलं होतं. सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हॉटेलच्या प्रत्येक खोलीची तपासणी केली. यावेळी त्यांना तीन जोडपे आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले. पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

पोलिसांच्या मते, तिन्ही तरुणांना तरुणींसोबत आपत्तीजनक अवस्थेत पकडण्यात आलं होतं. यात ब्यावराचा काँग्रेसचा ब्लॉक अध्यक्ष राहुल दांगीही होता. कारवाईनंतर हॉटेल मॅनेजरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छापेमारी नंतर पकडण्यात आल्यावर काँग्रेस नेत्याने सर्व आरोप फेटाळून लावले. मी केवळ चहा पिण्यासाठी हॉटेलात आलो होतो, असा दावा त्याने केला आहे.

पोलिसांनी कारवाई दरम्यान, राहुल दांगी, उमाकांत पुरी आणि इंद्र सिंह मेहर यांना ताब्यात घेतलं. राहुल दांगी हा काँग्रेसचा नेता आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन कसून तपासणी केली. त्यानंतर हॉटेलातील तिन्ही तरुणींचीही कसून चौकशी करण्यात आली. दरम्यान, राहुल दांगीने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही राजस्थानच्या कामखेडा मंदिरातून दर्शन करून येत होतो. रस्त्यात चहा पिण्यासाठी हॉटेलात थांबलो. त्यावेळी पोलिसांनी आम्हालाही ताब्यात घेतलं. आम्हाला चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात गोवण्यात आलं आहे, असं दांगी म्हणाले.

तर, ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणींकडून कोणतीही तक्रार आली नसल्याने पोलिसांनी तीन युवक आणि हॉटेल मॅनेजरच्या विरोधात शांतता भंग करण्याच्या कलमाखाली कारवाई केली. सर्व आरोपींना तहसीलदारांसमोर सादर करण्यात आलं. तिथे त्यांना जामीन मिळाला. राहुल दांगीलाही जामीन मिळाला आहे. दरम्यान, या प्रकरणात काँग्रेस नेत्याचं नाव आल्याने पक्षाची बेआब्रू झाली आहे. त्यामुळेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दांगीला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • म्युच्युअल फंडांची मोठी खेळी! ‘या’ सोलर स्टॉकमध्ये खरेदी केली 10 कोटी शेअर्स; हिस्सेदारी 350 टक्के वाढली
  • जळगाव हादरलं! भरधाव ट्रक कावड येत्रात घुसला, 8 वर्षीय चिमुकल्याला चिरडलं
  • ‘या’ 5 दमदार कार्स ठरतील सर्वोत्तम पर्याय, पहिली जनरेशन Honda Jazz अपग्रेड करायचीय? जाणून घ्या
  • टाटा मोटर्सची बंपर ऑफर! ऑगस्टमध्ये गाडी खरेदीवर मिळणार तब्बल 2.25 लाख रुपयांपर्यंतचा फायदा
  • नवीन बाईक खरेदी केल्यानंतर पश्चात्ताप नको; डिलिव्हरी घेण्यापूर्वी नक्की तपासा ‘या’ गोष्टी!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in