• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड युजर्सना मोठा झटका ! 28 ऑगस्टपासून बदलणार लेट फी आणि रिवॉर्ड पॉईंट्सचे नियम

August 24, 2026 by admin Leave a Comment


ॲक्सिस बँकेने क्रेडिट कार्ड धारकांना मोठा झटका देत नियम बदलण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत परदेशातील व्यवहारांवरील DCC मार्कअप शुल्क वाढवण्यात आले असून, 50 हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकीवर लेट पेमेंट फी 1,300 रुपये करण्यात आली आहे. तसेच टोल आणि गिफ्ट कार्डवरील रिवॉर्ड पॉईंट्सचे नियमही बदलले आहेत.

हे नवीन सुधारित नियम 28 ऑगस्ट 2026 पासून लागू होणार आहेत. बँकेने जारी केलेल्या नवीन परिपत्रकानुसार, परदेशातील पेमेंटवरील चार्जेस, लेट पेमेंट फी, विमानतळावरील लाउंज एक्सेस आणि रिवॉर्ड पॉईंट्सच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या मासिक खर्चावर आणि क्रेडिट कार्डच्या फायद्यांवर होणार आहे.

परदेशातील व्यवहारांवर जादा शुल्क

परदेशात प्रवास करताना किंवा आंतरराष्ट्रीय वेबसाइटवर भारतीय चलनात (INR) पेमेंट करणाऱ्या युजर्सना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. बँकेने डायनॅमिक करन्सी कन्व्हर्जन (DCC) मार्कअप फी थेट 1.5 टक्क्यांवरून वाढवून 3.5 टक्के अधिक लागू कर इतकी केली आहे. म्हणजेच आंतरराष्ट्रीय पेमेंट आता 133 टक्के पेक्षा जास्त महागणार आहे. मात्र, मॅग्नस आणि मॅग्नस फॉर बरगंडी कार्डसाठी हा दर 2 टक्के असेल, तर ऑलिम्पस कार्डसाठी 1.8 टक्के राहील.

लेट पेमेंट फी मध्ये वाढ

जर तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही ते वेळेत भरले नाही, तर आता 1,300 रुपये लेट पेमेंट फी आकारली जाईल (यापूर्वी ही फी 1,200 रुपये होती). 50,000 रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या इतर स्लॅबच्या शुल्कात (उदा. 501 ते 5000 साठी 500) कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

‘या’ व्यवहारांवर रिवॉर्ड पॉईंट्स बंद

बँकेने रिवॉर्ड पॉईंट्स मिळण्याच्या श्रेणींमध्ये मोठी कपात केली आहे. 28 ऑगस्टपासून हायवे टोल पेमेंट, ब्रिज फी आणि रोड टॅक्स भरल्यास ग्राहकांना कोणतेही रिवॉर्ड पॉईंट्स किंवा कॅशबॅक मिळणार नाही. याशिवाय, गिफ्ट कार्ड खरेदीवरही रिवॉर्ड्स मिळणार नाहीत आणि ही रक्कम वार्षिक फी सवलतीसाठीच्या एकूण खर्चामध्ये गणली जाणार नाही.

डोमेस्टिक एअरपोर्ट लाउंज ॲक्सेसचे नियम बदलले

भारतातील विमानतळांवर मोफत लाउंज एक्सेस मिळवण्याच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. आता पात्र प्रीमियम कार्डधारकांना भारतातील लाउंजमध्ये प्रवेश करण्यासाठी ‘प्रायोरिटी पास’ वापरता येणार नाही. लाउंज एक्सेससाठी ग्राहकांना त्यांचे फिजिकल ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड आणि वैध बोर्डिंग पास काउंटरवर दाखवणे बंधनकारक असेल. आंतरराष्ट्रीय लाउंजसाठी मात्र प्रायोरिटी पास पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.

पेमेंट ॲडजस्टमेंटचा नवीन प्राधान्यक्रम

क्रेडिट कार्डचे बिल भरताना रक्कम कशा प्रकारे जमा होईल, याचा क्रमही बँकेने निश्चित केला आहे. तुम्ही भरलेली रक्कम सर्वात आधी थकीत शुल्क, दंड आणि करांवर जमा होईल. त्यानंतर अनुक्रमे ईएमआय, व्याज, रिटेल खरेदी आणि सर्वात शेवटी रोख उचल यासाठी ती रक्कम ॲडजस्ट केली जाईल

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Amitabh Bachchan : जया बच्चन यांचा ‘ओरडा’ टाळण्यासाठी अमिताभ बच्चन काय करतात? सांगितला मजेशीर किस्सा
  • म्युच्युअल फंडांची मोठी खेळी! ‘या’ सोलर स्टॉकमध्ये खरेदी केली 10 कोटी शेअर्स; हिस्सेदारी 350 टक्के वाढली
  • जळगाव हादरलं! भरधाव ट्रक कावड येत्रात घुसला, 8 वर्षीय चिमुकल्याला चिरडलं
  • ‘या’ 5 दमदार कार्स ठरतील सर्वोत्तम पर्याय, पहिली जनरेशन Honda Jazz अपग्रेड करायचीय? जाणून घ्या
  • टाटा मोटर्सची बंपर ऑफर! ऑगस्टमध्ये गाडी खरेदीवर मिळणार तब्बल 2.25 लाख रुपयांपर्यंतचा फायदा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in