
गेल्या काही दिवसांपासून भारतात सर्वात मौल्यवान असलेला धातू सोने खरेदी करणे सर्वसमान्यांसाठी कठीण झाले आहे. कारण, सोने आणि चांदीचे भाव आकाशाला स्पर्श करताना दिसत आहेत. आता सोन्याचे भाव स्थिर झाल्याचे पाहायला मिळत आहे.
काल, 21 एप्रिल रोजी आणि आज 22 एप्रिल रोजी सोन्याच्या दरात ना वाढ झाली आहे ना घट झाली आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे भाव स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहेत.
आज, 22 एप्रिल रोजी जवळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 56 हजार 766 रुपयांवर पोहोचले आहेत. तर एक किलो चांदीचे भाव जीएसटीसह 2 लाख 60 हजार 590 रुपयांवर आहेत.
मिडल इस्टमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा मोठा परिणाम हा सोने आणि चांदीच्या भावावर होताना दिसतो. पण काल आणि आज सोने आणि चांदीचे दर हे स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे.




Leave a Reply