• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

US, Iran Conflict : इराणचा गेम ओव्हर, ट्रम्प यांचा एक डाव अन् अमेरिका ठरली गेमचेंजर, आता युद्धात नव्या देशाची एन्ट्री

April 22, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये 39 दिवस भीषण युद्ध सुरू होतं. या काळात अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. मात्र दुसरीकडे इराणने केलेल्या मिसाईल हल्ल्यांमुळे इस्त्रायलमध्ये हाहाकार उडाला होता. इस्त्रायलचं मोठं नुकसान झालं. तर याच काळात इराणकडून आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या सैन्य तळांवर देखील हल्ले करण्यात आले होते. इराणच्या ड्रोनचा अमेरिकेनं चांगलाच धसका घेतला होता. खूप प्रयत्न करूनही डोनाल्ड ट्रम्प यांना इराणच्या ड्रोनला नष्ट करण्याचा तोडगा सापडत नव्हता. इराणने अमेरिकेचे काही फायटर जेट देखील पाडले होते. मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांना मोठं यश मिळालं आहे. मध्य पूर्वेतून मोठी बातमी समोर येत आहे. इराणचे ड्रोन नष्ट करण्यासाठी आमची मदत करावी अशी मागणी अनेकदा ट्रम्प यांनी युक्रेनकडं केली होती, अखेर यामध्ये ट्रम्प यांना यश आलं आहे.

अमेरिकेकडून आता सौदी अरेबियाच्या प्रिंस सुलतान एअर बेसवर युक्रेनची सर्वात खतरनाक ड्रोन विरोधी सिस्टम तैनात करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेकडून सौदी अरेबीयाच्या प्रिंस सुलतान एअरबेसवर युक्रेनची ड्रोन विरोधी सिस्टम तैनात करण्यात आली आहे. नुकतीच युक्रेनेच्या सैन्य अधिकाऱ्यांनी ही सिस्ट्रीम कशी हाताळायची याबाबत अमेरिकनं सैन्यांना प्रशिक्षण देखील दिलं आहे. ही सिस्टम ड्रोनच्या धोक्यांना ओळखून त्यांना हवेतच नष्ट करते. अमेरिकेला आता ही युक्रेनची सिस्टम मिळाल्यामुळे इराणच्या ड्रोनचा सहज सामना करता येणार आहे. हा इराणसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

युद्धविराम पुन्हा वाढवला

दरम्यान अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांचा युद्धविराम झाला होता, त्याची मुदत आज संपली त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा एकदा युद्धविराम वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे, मात्र तरी देखील स्ट्रेट ऑफ होर्मूजवर अजूनही तणाव कायम आहे. इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये तीन जहाजं ताब्यात घेण्यात आले आहेत, त्यातील एक हजाज हे भारताच्या दिशेनं निघालं होतं. एवढंच नाही तर इराणने चीनच्या जहाजांना देखील परवानगी नाकारली आहे. सोमवारी अमेरिकेनं इराणचं एक जहाज ताब्यात घेतलं होतं.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तिच्या सौंदर्यावर अख्खा भारत फिदा, अचानक झाली गायब, अंडरवर्ल्डमुळे या अभिनेत्रीसोबत घडलं होतं खूपच वाईट!
  • ती तुझ्या-माझ्या आड येतेय का? थांब…अनैतिक संबंधाचा क्रूर शेवट; महिलेने थेट घरात जाऊन…संभाजीनगर हादरलं!
  • पायपुसणी, टॉवेल,चमचे…बाली येथील हॉटेलचे साहित्य चोरताना सापडले भारतीय टुरिस्ट, VIDEO
  • आलिया भट्ट माझ्यासोबत…पाकिस्तानी अभिनेत्री हे काय बोलून गेली; महेश भट्ट यांच्याविषयही केला मोठा खुलासा!
  • Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग या चार चुका कधीच करू नका, चाणक्य काय सांगतात?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in