
बॉलिवूडमध्ये 90 च्या दशकात अनेक नवे कलाकार आले. यातील काही कलाकारांना आपला जम बसवता आला तर काही कलाकार मात्र फारच लवकर बॉलिवूडमधून कुठेतरी गायब झाले. आपले करिअर भरात असताना अशीच एक अभिनेत्री बॉलिवूडमधून अचानक जायब झाली. ही अभिनेत्री कोण, तिच्यासोबत काय घडलं होतं, ते जाऊन घेऊ या…
ही अभिनेत्री 90 च्या दशकात खूपच प्रसिद्ध होती. परंतु अंडरवर्ल्डच्या भीतीने ती लाईमलाईट आणि बॉलिवुडपासून खूप दूर गेली. या अभिनेत्रीचे नाव आहे साक्षी शिवानंद. या अभिनेत्रीने अन्ना वदिना या तुलुगू चित्रपटापासून आपल्या करिअरला सुरूवात केली. 1993 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
दक्षिण भारतातील सिनेमात काम केल्यानंतर ती बॉलिवूडमध्ये आली. साक्षीने बॉलिवूडमध्ये जन्म कुंडली, पापा कहते है, आपको पहले भी कहीं देखा है या अशा प्रसिद्ध चित्रपटांत काम केले. तिला दिवसेंदिवस खूप प्रसिद्धी मिळत होती.
परंतु तिला जसे जसे प्रसिद्धी मिळू लागली तसे तसे तिचे जगणे कठीण होऊ लागले. तिला थेट अंडरवर्ल्डमधून फोन कॉल येऊ लागले. मी ज्या चित्रपटात काम करत आहे, त्या चित्रपटाच्या निर्मात्याचे अंडरवर्ल्डसोबत संबंध आहे, हे तिला समजून आले. हे सगळं समजल्यानंतर ती खूप घाबरली.
अंडरवर्ल्डला घाबरून ती बॉलिवूडमधून बाहेर पडली. ती परत तेलुगू आणि कन्नड सिनेसृष्टीत गेली आणि तिथे चित्रपटांत काम करू लागली. बॉलिवूडमधून बाहेर पडल्यानंतर तिने तिचा नंबरही बदलला होता.




Leave a Reply