• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

काय, खरातची बायकोच पलटली! पतीने व्यवहार केले, मग पत्नी… नेमकं काय घडलं?

April 22, 2026 by admin Leave a Comment


शिर्डी येथील जमिनीच्या व्यवहारातून फसवणूक केल्याप्रकरणी फरार असलेल्या कल्पना खरात यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर राहाता सत्र न्यायालयात खडाजंगी झाली. सुनावणी दरम्यान अधिकाऱ्यांनी मांडलेल्या एका मुद्द्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. “कल्पना खरात या कुठेही नोकरी करत नाहीत किंवा त्यांचा कोणताही स्वतंत्र व्यवसाय नाही, मग तरीही त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ७ कोटी रुपयांचे व्यवहार झाले कसे?” असा रोखठोक सवाल तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयात उपस्थित केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

कॅप्टन अशोक खरात यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर शिर्डीतील गोंदकर यांनी जुन्या व्यवहारावरून शिर्डी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात कल्पना खरात या आरोपी असून त्या सध्या फरार आहेत. अटक टाळण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली असून आज सरकारी पक्ष, फिर्यादी आणि आरोपींच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला.

आरोपीच्या वकिलांचा दावा: “पतीने केले व्यवहार, पत्नीचा काय संबंध?”

कल्पना खरात यांचे वकील प्रशांत गिरी यांनी असा युक्तिवाद केला की, फिर्यादीने दीड वर्षानंतर हा गुन्हा केवळ जुन्या व्यवहाराचा फायदा मिळवण्यासाठी केला आहे. व्यवहार झाला तेव्हा कल्पना खरात उपस्थित नव्हत्या. “कल्पना खरात यांचे बँक खाते त्यांचे पती अशोक खरातच ऑपरेट करत होते. केवळ त्यांच्या खात्यातून व्यवहार झाले म्हणून त्यांना आरोपी करता येणार नाही. त्यांनी कधीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे व्याजाची रक्कम मागितलेली नाही,” असे गिरी यांनी कोर्टाला सांगितले. केवळ मुक्तीयार पत्र त्यांच्या नावावर आहे, पतीने केलेल्या गुन्ह्यांशी त्यांचा संबंध नाही, असेही त्यांनी नमूद केले.

सरकारी वकिलांचा पलटवार: “कागदपत्रांवर सही आणि अंगठा मग उपस्थित कशी नाही?”

सरकारी वकील बी.डी. पानगव्हाणे यांनी आरोपीच्या वकिलांचे दावे खोडून काढले. “जमीन खरेदीच्या कागदपत्रांवर कल्पना खरात यांची सही आणि अंगठा आहे. याचाच अर्थ त्या त्यावेळी हजर होत्या. खरेदी २३ तारखेला झाली तरी खरेदीखत २२ तारखेलाच का बनवले? तसेच २ टक्के व्याजाचा दरही कल्पना खरात यांनीच ठरवला होता,” असा युक्तिवाद पानगव्हाणे यांनी केला. या व्यवहारात जितेंद्र शेळके आणि महेंद्र शेळके या साक्षीदारांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.

तपासी अधिकाऱ्यांचा ७ कोटींचा सवाल!

सर्वात महत्त्वाचा युक्तिवाद तपास अधिकारी निवांत जाधव यांनी केला. त्यांनी कल्पना खरात यांच्या बँक खात्याचा तपशील कोर्टात सादर केला. खरात यांच्या ४० टक्के मालमत्तेत कल्पना खरात भागीदार आहेत आणि प्रत्येक शासकीय कार्यालयात खरेदीसाठी त्या स्वतः गेल्या आहेत. अशा वेळी “कोणताही व्यवसाय किंवा नोकरी नसताना त्यांच्या खात्यातून ७ कोटींचे व्यवहार झालेच कसे?” हा मुद्दा पोलिसांनी लावून धरला आहे.

आता या तिन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालय कल्पना खरात यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करते की फेटाळते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जामीन फेटाळला गेल्यास कल्पना खरात यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार असल्याचे चिन्हे आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs CSK Live Streaming : मुंबई-चेन्नई हायव्होल्टेज सामना, पलटणच्या मॅचची वेळ बदलली?
  • सोनं झालं खूपच स्वस्त, एकाच दिवसात चक्क इतकी घसरण, 10 ग्रॅमचा नवा भाव काय?
  • IPL 2026 Points Table : लखनौला पराभूत करत राजस्थान टॉप 2 मध्ये, आरसीबीला मोठा झटका
  • MI vs CSK : मुंबई-चेन्नई सामन्यासाठी सज्ज, रोहित-धोनी खेळणार?
  • शरीरातील पाण्याची कमतरता होईल दूर आणि उष्णतेपासूनही मिळेल आराम, आहारात ‘या’ देसी पदार्थांचा करा समावेश

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in