• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

MI vs CSK Live Streaming : मुंबई-चेन्नई हायव्होल्टेज सामना, पलटणच्या मॅचची वेळ बदलली?

April 22, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेट चाहत्यांना गुरुवारी 23 एप्रिलला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात सर्वात मोठा सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्यात स्पर्धेतील 2 यशस्वी संघ आमनेसामने असणार आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात हा सामना होणार आहे. हार्दिक पंड्या मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तर ऋतुराज गायकवाड याच्याकडे यलो आर्मीच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील सातवा सामना असणार आहे. मुंबईच्या नेट रनरेटचा अपवाद वगळता दोन्ही संघांचे आकडे सारखेच आहेत. दोन्ही संघांना या मोसमात आतापर्यंत आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आता दोन्ही संघांचा एकमेकांसमोर चांगलाच कस लागणार आहे. या निमित्ताने मुंबई विरुद्ध चेन्नई साम्नयातील महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना कधी?

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना गुरुवारी 23 एप्रिलला होणार आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना कुठे?

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना वानखेडे स्टेडियम, मुंबई इथे होणार आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्स पाहायला मिळेल. तर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहता येईल. तर उभयसंघातील सामन्यातील लाईव्ह अपडेट्स https://www.tv9marathi.com/sports/cricket-news या लिंकद्वारे जाणून घेता येतील.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs CSK Live Streaming : मुंबई-चेन्नई हायव्होल्टेज सामना, पलटणच्या मॅचची वेळ बदलली?
  • सोनं झालं खूपच स्वस्त, एकाच दिवसात चक्क इतकी घसरण, 10 ग्रॅमचा नवा भाव काय?
  • IPL 2026 Points Table : लखनौला पराभूत करत राजस्थान टॉप 2 मध्ये, आरसीबीला मोठा झटका
  • MI vs CSK : मुंबई-चेन्नई सामन्यासाठी सज्ज, रोहित-धोनी खेळणार?
  • शरीरातील पाण्याची कमतरता होईल दूर आणि उष्णतेपासूनही मिळेल आराम, आहारात ‘या’ देसी पदार्थांचा करा समावेश

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in