
राजस्थान रॉयल्सने रियान पराग याच्या नेतृत्वात आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात सलग 4 सामने जिंकून चाबूक सुरुवात केली. मात्र विजयी चौकारानंतर राजस्थानची गाडी विजयाच्या ट्रॅकवरुन घसरली. राजस्थानला सलग 2 सामने गमवावे लागले. राजस्थानचा 22 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सामना झाला. लखनौनेही सलग 3 सामने गमावले होते. त्यामुळे लखनौसमोर राजस्थान विरूद्धच्या सामन्यात सलग चौथा पराभव टाळण्याचं आव्हान होतं. लखनौ घरच्या मैदानात हे आव्हान पेलण्यात अपयशी ठरली. लखनौला 160 धावांचा पाठलाग करताना 18 ओव्हरमध्ये ऑलआऊट 119 रन्सच करता आल्या. राजस्थानने अशाप्रकारे 40 धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला. राजस्थानला या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये फायदा झाला आहे. या सामन्यानंतर राजस्थानने किती मोठी झेप घेतलीय? हे जाणून घेऊयात.
Leave a Reply