• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ती तुझ्या-माझ्या आड येतेय का? थांब…अनैतिक संबंधाचा क्रूर शेवट; महिलेने थेट घरात जाऊन…संभाजीनगर हादरलं!

April 22, 2026 by admin Leave a Comment


Chhatrapati Sambhaji Nagar News : माणसाचं आयुष्य हे मोठं विस्मयकारक आहे. हे जीवन कधी कोणत्या मार्गाला कसं वळण घेईल काहीच सांगता येत नाही. राग, सूड, टोकाचं प्रेम या भावना माणसाचा कधी घात करतील हे सांगता येत नाही. सध्या याचीच प्रचिती छत्रपती संभाजीनगर शहरात आली आहे. येथे एका महिलेने आपल्या प्रियकरावर, त्याच्या पत्नीवर सूड उगवण्यासाठी क्रूरतेचं टोक गाठलं आहे. या महिलेने रागाच्या भरात प्रियकराच्या घरात जाऊन थेट त्याच्या पत्नीचाच काटा काढला आहे. या घटनेनं संपूर्ण शहर हादरलं असून क्रूर घटनेची सगळीकडेच चर्चा होत आहे. या प्रकरणातील आरोपी महिलेला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार शहरातील वाळूज परिसरातील बजाजनगर येथे ही घटना घडली आहे. येथे एका 40 वर्षीय महिलेला निर्घृण पद्धतीने संपवण्यात आले आहे. प्रेमप्रकरणाला विरोध केल्याने प्रेयसीने प्रियकराच्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. मृत महिलेचे नाव साधना महेंद्र सोनपेटकर (वय 40) असे आहे. तर आरोपी महिलेचे नाव शैला सोनार (वय 45) असे असून तिला वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

घरात घुसून चाकूने गळ्यावर, पोटावर केले वार

आरोपी महिलेचे मृत महिलेच्या पतीसोबत संबंध होते. या संबंधांना पत्नीने विरोध केल्याने दोघींमध्ये वाद होत होते. याच वादातून आरोपीने संधी साधून पीडितेच्या घरी प्रवेश केला आणि चाकूने वार केले. पोट आणि गळ्यावर गंभीर जखमा झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त सापडले असून हल्ला अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनास्थळाहून आरोपी महिलेला घेतले ताब्यात

तसेच घटनास्थळी पिस्तूलही आढळून आल्याने त्याच्या वापराबाबतही तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आरोपी महिलेला ताब्यात घेतले. झटापटीदरम्यान आरोपी महिला किरकोळ जखमी झाली असून तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाळूज एमआयडीसी पोलीस करत असून, या घटनेमुळे बजाजनगर परिसरात खळबळ उडाली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • काय, खरातची बायकोच पलटली! पतीने व्यवहार केले, मग पत्नी… नेमकं काय घडलं?
  • Chanakya Niti : यशस्वी व्हायचंय मग विद्यार्थ्यांकडे हे गुण हवेच, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
  • Jio चा 84 दिवस चालणारा स्वस्त प्लान, फ्री कॉलिंग आणि डेटा सोबत मिळते JioHotstar
  • Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीचा आणखी एक कारनामा, 8 धावांसह मोठा रेकॉर्ड ब्रेक
  • 23 एप्रिलचा दिवस म्हणजे लाखात एक, या लकी राशींच्या नशिबात होणार चमत्कार; वाचा राशीभविष्य!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in