• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

LSG vs RR Toss : लखनौचा फिल्डिंगचा निर्णय, वैभव सूर्यवंशी राजस्थानला 200 पार पोहचवणार?

April 22, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 32 व्या सामन्यात आज 22 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनसेामने आहेत. राजस्थान आणि लखनौ या दोन्ही संघांचा हा प्रत्येकी सातवा सामना आहे. इशान किशन याच्याकडे सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर रियान पराग राजस्थानचं नेतृत्व करणार आहे. या 2 युवा कर्णधारांमध्ये चाहत्यांना चुरस पाहायला मिळणार आहे. उभयसंघातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. लखनौच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन पंतने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत राजस्थानला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण कोण?

राजस्थानने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर दुसऱ्या बाजूला लखनौ सुपर जायंट्स 2 बदलांसह मैदानात उतरणार आहे. मनीमरण सिंग याच्या जागी दिग्वेश राठी याचा समावेश करण्यात आला आहे. तर वेगवान गोलंदाज आवेश खान याच्या जागी प्लेइंग ईलेव्हन मयंक यादव याला संधी देण्यात आली आहे. मयंकचा हा या मोसमातील पहिलाच सामना असणार आहे.

लखनौमधील आकडेवारी

दरम्यान लखनौतील एकाना स्टेडियममध्ये हा सामना आयोजित करण्यात आला आहे. आयपीएल स्पर्धेत 2025 पासून या मैदानात एकूण 2 वेळा पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय झाला आहे. तर 8 वेळा चेजिंग करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. या मैदानात पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या ही 185 इतकी आहे. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीने राजस्थानला या मोसमात अप्रतिम सुरुवात मिळवून दिली आहे. त्यामुळे ही सलामी जोडी लखनौ विरुद्ध राजस्थानला कशी सुरुवात मिळवून देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग (कॅप्टन), शिमरॉन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई, ब्रिजेश शर्मा आणि नांद्रे बर्गर.

लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : मिचेल मार्श, आयुष बडोनी, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), निकोलस पूरन, एडन मार्कराम, मुकुल चौधरी, मोहम्मद शमी, मोहसीन खान, प्रिन्स यादव, दिग्वेश सिंग राठी आणि मयंक यादव.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आलिया भट्ट माझ्यासोबत…पाकिस्तानी अभिनेत्री हे काय बोलून गेली; महेश भट्ट यांच्याविषयही केला मोठा खुलासा!
  • Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग या चार चुका कधीच करू नका, चाणक्य काय सांगतात?
  • Vastu Shastra : करा वास्तुशास्त्रामधील हे 5 सोपे उपाय, होईल भाग्योदय, आयुष्यच बदलून जाईल
  • Bangladesh : भारताशी पंगा घेणाऱ्या बांगलादेशला आयसीसीचा दणका, अशी कारवाई, काय झालं?
  • जरांगे पाटलांना मारण्याचा कराड गँगचा प्लॅन? जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर, थेट आव्हानाच स्वीकारलं…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in