
हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात केवळ तुमच्या घराची रचना कशी असावी आणि कशी असू नये? याबाबतच माहिती देण्यात आलेली नाहीये. तर तुमच्या आयुष्यात ज्या समस्या निर्माण होतात, त्यावर देखील उपाय सांगण्यात आले आहेत.अनेकदा असं होतं की आपण खूप कष्ट करतो, परंतु आपल्याला आपल्या मेहनतीचं अपेक्षित फळ मिळत नाही. सगळं सुरळीत सुरू असताना अचानक आर्थिक अडचणी येतात, व्यवसायामध्ये तोटा होतो. काहीही कारण नसताना घरातील सदस्यांसोबत वादविवाद होण्यास सुरुवात होते. हा सर्व तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जेचा देखील परिणाम असू शकतो. वास्तुशास्त्रात असे काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव नष्ट करू शकता, आज आपण अशाच काही उपायांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
उत्तर दिशा – जर तुम्हाला आर्थिक समस्या येत असतील तर सर्वात आधी तुमच्या घराची उत्तर दिशा तपासा, ही दिशा नेहमी स्वच्छ ठेवा. या दिशेला कोणताही पसारा नसावा. तसेच उत्तर दिशेला जी भिंत आहे, त्या भिंतीला तुम्ही कुबेराचा फोटो लावू शकतात. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा असल्यामुळे हा उपाय केल्यास तुमच्या घरात धनाची आवक वाढेल.
पश्चिम दिशा – पश्चिम दिशा ही शनी देवाची दिशा असते, त्यामुळे ही दिशा नेहमी स्वच्छ ठेवावी, यामुळे घरात शनीदोष निर्माण होत नाही. शनी महाराजांच्या आशीर्वादाने घराला आर्थिक स्थैर्य लाभतं. तसेच तुम्हाला तुमच्या कामाचं योग्य फळ देखील मिळतं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
तिजोरी – घराची तिजोरी ही नेहमी दक्षिण -पश्चिम दिशेच्यामध्ये असावी. या उपायामुळे तिजोरी पैशांनी नेहमी भरलेली राहते, अनावश्यक खर्चाला आळा बसतो. आर्थिक बरकत प्राप्त होते.
तिजोरीसमोर आरसा ठेवा – तुमची तिजोरी ज्या स्थानावर आहे, त्या स्थानाच्या बरोबर समोर आरसा ठेवावा. वास्तुशास्त्रानुसार या उपायामुळे तुम्हाला कधीही पैशांची कमी भासत नाही, तसेच जर तुमच्यावर एखादं अनपेक्षित आर्थिक संकट येणार असेल तर ते देखील दूर होतं.
मुख्य दरवाजाचा उंबरा – घराची स्वच्छता करताना घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा नेहमी पाण्यानं पुसून घ्यावा. हा उंबरा पुसण्यासाठी तुम्ही जे पाणी वापरणार आहात, त्यामध्ये थोडं मीठ टाका, त्यामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतील, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Leave a Reply