• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तामिळनाडू आणि प.बंगालमध्ये मतांसाठी नोटा आणि दारुचा अक्षरश: पाऊस, एक हजार कोटींचा माल जप्त

April 22, 2026 by admin Leave a Comment


तामिळनाडू आणि प. बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणूकांचा पहिला टप्प्याचे मतदान उद्या ( २३ एप्रिल ) रोजी होत आहे.मतदानाच्या एक दिवस आधी निवडणूक आयोगाने जारी केलेले आकडे धक्कादायक आहे. दोन्ही राज्यात आतापर्यंत १,००० कोटी रुपयांहून अधिक रोकड, दारु, ड्रग्स आणि मोफत गिफ्ट जप्त केली आहेत. आयोगाची करडी नजर आणि प्रवर्तन एजन्सीची सक्रीयता यामुळे रेकॉर्ड जप्ती केली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी कशी प्रलोभने राजकीय पक्षांकडून दाखवली जात आहेत याचा हा पुरावा आहे.निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध असून कोणताही गैर प्रकार खपवून घेतला जाणार नाही असे म्हटले आहे.

काय काय जप्त केले ?

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकड्यांनुसार तामिळनाडू आणि प.बंगालमध्ये २६ फेब्रुवारीपासून आतापर्यंत एकूण १,०७२.१३ कोटी रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. एकट्या तामिळनाडूत ५९९.२४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. तर प.बंगालमध्ये हा आकडा ४७२.८९ कोटी रुपयांचा आहे. रोकडच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर दारु, अंमली पदार्थ, मौल्यवान धातू- सोने आणि चांदी देखील जप्त केले आहेत. आयोगाने सांगितले की इलेक्शन सीझर मॅनेजमेंट सिस्टीम सक्रीय झाल्यानंतर या राज्यात अवैध हालचालींवर करडी नजर ठेवण्यात आली होती.

तामिळनाडूत १००.१९ कोटी रुपयांची रोकड, १५९.३१ कोटी रुपयांचा सोने-चांदी जप्त केली आहे. प.बंगालमध्ये २७.४८ कोटीची रोकड आणि सुमारे १०२.४५ कोटीचे दारू ( ३९ लिटर ) जप्त केली आहे. बंगालमध्ये नशेची औषधेही जप्त केली असून त्यांची किंमत १०८.११ कोटी रुपये सांगितली जात आहे. दोन्ही राज्यात सगळ्यात जास्त मोफत गिफ्टचा सर्वाधिक वापर झाला. मतदारांना आकर्षित करण्यासाठी तामिळनाडूत २५९.१४ कोटी रुपये आणि बंगालात १७८.८४ कोटी रुपयांचे मोफत गिफ्ट जप्त झाले आहेत.

संशयास्पद कारवायांवर कारवाई करण्यासाठी आणि तक्रारींचा जलद निपटारा करण्यासाठी निवडणूक आयोगाने मोठ्या संख्ये टेहळणी पथके तैनात केली आहे. दोन्ही राज्यात एकूण ५,०११ भरारी पथके आणि ५,३६३ स्टेटिक सर्व्हेलान्स पथके नेमली होती. या टीम संवेदनशील भागात अचानक छापा टाकत होती. चेक पोस्ट तयार करुन वाहनांची तपासणी करत होती. सी- व्हीजिल एपद्वारे मिळणाऱ्या तक्रारींचा निपटारा १०० मिनिटांच्या आत केला जात आहे.निवडणूक आयोगाने मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना आदेश दिले आहेत की निवडणूक हिंसा आणि प्रलोभन मुक्त व्हावे असे आदेश दिले आहेत.

अधिकाऱ्यांना काय सूचना ?

निवडणूक आयोगाने म्हटले आहे की तपासणी दरम्यान सर्व सामान्य लोकांना त्रास देऊ नये. सर्व सामान्य जनतेच्या सोयी आणि सुविधेची काळजी घेण्यासही सांगितले आहे. आयोगाने राजकीय पक्ष आणि नागरिकांना अपिल केली आहे की निवडणूक मर्यादा राखण्यास मदत करावी. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत उद्या ( २३ एप्रिल ) पहिल्या टप्प्याचे मतदान होत आहे. या निवडणूकीचे निकाल ४ मे रोजी घोषीत होणार आहेत.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सामान्यांना सर्वात मोठा दणका, पेट्रोलचा भाव 25 रुपयांनी वाढणार? लवकरच…चिंता वाढली!
  • SAW vs INDW, 3rd T20i : टीम इंडियातून दोघींचा पत्ता कट, अमरावतीकर खेळाडूला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी
  • काय, खरातची बायकोच पलटली! पतीने व्यवहार केले, मग पत्नी… नेमकं काय घडलं?
  • Chanakya Niti : यशस्वी व्हायचंय मग विद्यार्थ्यांकडे हे गुण हवेच, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
  • Jio चा 84 दिवस चालणारा स्वस्त प्लान, फ्री कॉलिंग आणि डेटा सोबत मिळते JioHotstar

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in