
दादरमध्ये वीर सावरकर मार्गावर ठाकरे बंधूंची आज जल्लोष सभा होणार असून यांची जोरदार तयारी करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे, आत्तापासूनच तरूणाईने आंदोलन स्थळी जमण्यास सुरुवात केली आहे. चोहीकडे आनंदाचं वातावरण आहे.
तरुणांनी देशाला ‘भीतीच्या वातावरणातून’ बाहेर काढले आहे. त्यामुळे देशातील तरुणांचे अभिनंदन करण्यासाठी शिवसेना मनसे पक्षांनी आयोजित केलेली रविवारची सभा ही जल्लोष सभा म्हणून होणार आहे, अशी घोषणा शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली होती.
काल, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या नेतृत्वाखालील हे आंदोलन केवळ प्रधान यांच्या राजीनाम्यापुरते मर्यादित नव्हते. यामध्ये जंतर मंतरवरील मुलांवर लाठीचार्ज करणाऱ्यांवरही कारवाई होणे गरजेचे आहे.
Leave a Reply