• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Team India : श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 15वा टी 20i कॅप्टन, सर्वात यशस्वी कोण?

July 2, 2026 by admin Leave a Comment

श्रेयस अय्यर भारताचा 15 वा टी 20I कर्णधार म्हणून नेतृ्त्व करत आहे. श्रेयसने आयर्लंड विरूद्धच्या टी 20I मालिकेतून कर्णधारपदाची सूत्र स्वीकारली. श्रेयस भारताला त्याच्या नेतृत्वात आयर्लंड विरुद्ध मालिका जिंकून देण्यात अपयशी ठरला. भारताला आयर्लंडकडून 0-2 अशा एकतर्फी फरकाने पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर आता टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभयसंघात 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिला सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. तर दुसरा सामना हा शनिवारी 4 जुलैला होणार आहे. या निमित्ताने आपण भारताचं नेतृत्व करणाऱ्या याआधीच्या 14 कर्णधारांबाबत जाणून घेणार आहोत.

टी 20I टीम इंडियाचा पहिला कॅप्टन कोण?

टीम इंडियाने 2006 साली पहिला टी 20I सामना खेळला होता. या पहिल्या सामन्यात वीरेंद्र सेहवाग याने भारताचं नेतृत्व केलं होतं. या सर्वात छोट्या फॉर्मेटमध्ये भारताने विजय मिळवला होता. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी याला कर्णधार करण्यात आलं होतं. महेंद्रसिंह धोनी याने त्याच्या नेतृत्वात आयसीसीचा पहिलाच टी 20I वर्ल्ड कप जिंकून दिला होता.

महेंद्रसिंह धोनी भारताचं सर्वाधिक सामन्यांत नेतृत्व करणारा कर्णधार राहिला. धोनीसह एकूण 14 कर्णधारांनी भारताचं किती टी 20I सामन्यांत नेतृत्व केलं? हे आपण जाणून घेऊयात.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vaibhav Sooryavanshi ला पदार्पणाची संधी मिळणारी की नाही? बॉलिंग कोच मॉर्ने मोर्कलने काय सांगितलं?
  • IND A vs SL A: दुसऱ्या औपचारिक कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत, साई सुदर्शनची शतकी खेळी आणि…
  • FIFA World Cup: ख्रिस्तियानो रोनाल्डोने करिअरमध्ये पहिल्यांदाच केली अशी कामगिरी, जाणून घ्या
  • हिरोचे वय हा अनुभव, तर हिरोईनचे वय समस्या का ? अभिनेत्री इशा कोप्पिकरचा सवाल
  • ममता बॅनर्जींना बंडखोरांचा आणखी एक दणका, आता थेट कार्यालयावर कब्जा; बंगालमध्ये काय घडतंय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in