
Tata Tiago EV च्या काही व्हेरिएंट्सवर ग्राहकांना १.४५ लाख रुपयांपर्यंतचे डिस्काऊंट मिळू शकते. हा संपूर्ण फायदा कॅश रकमेत मिळेल असे नाही. यात वेगवेगळ्या ऑफर, ग्राहकांची पात्रतेच्या हिशेबाने ही ऑफर वेगवेगळी असू शकते. त्यामुळे कार खरेदी करण्यापूर्वी डिलर कडून ऑफरची नीट माहिती घ्या..
Tiago EV भारतातील स्वस्त इलेक्ट्रीक कारपैकी आहे. सप्टेंबर 2026 याच्या बेस smart 19 medium range व्हेरिएंटची किंमत सुमारे 10.09 लाख रुपयांपर्यंत जाते. ऑफरचा लाभ मिळाल्यानंतर काही व्हेरिएंटवर ग्राहकांसाठी जास्त आकर्षक असू शकतात.
Tiago EV मध्ये वेगवेगळ्या क्षमतेच्या बॅटरीचे पर्याय मिळतात. याच 19.2kWh आणि 24kWh बॅटरी पॅक वाले व्हेरिएंट उपलब्ध आहे. छोट्या बॅटरीचे मॉडेल मुख्यत: शहरातील लोकांना घर ते कार्यालयासाठी उपयुक्त आहे. जर जास्त क्षमतेचे Long Range मॉडेल त्या ग्राहकांसाठी चांगले आहे जे लांबचा प्रवास करु शकतात.
सप्टेंबरच्या ऑफरमध्ये स्मार्ट 19 मीडियम रेंज, प्युअर प्लस 19 मीडियम रेंज, प्युअर प्लस 24 लाँग रेंज आणि क्रिएटिव्ह प्लस 24 लाँग रेंज यांसारख्या व्हेरिएंट्सचा समावेश असल्याचे वृत्त आहे. व्हेरिएंटनुसार फायदे वेगवेगळे असू शकतात.
1.45 लाखांचा फायदा ही कमालीची ऑफर आहे. मात्र, प्रत्येक ग्राहकाला एकसारखीच सूट मिळेलच असे नाही. एक्सचेंज, स्क्रॅपेज, लॉयल्टी किंवा इतर फायदे ग्राहकाच्या स्थितीवर आणि कार डीलरच्या योजनेवर ठरतील.
Tiago EV ईव्ही कार बुक करण्यापूर्वी, तुमच्या शहरातील डीलरकडून कॅश डिस्काऊंट, एक्सचेंज बोनस आणि इतर फायद्यांविषयी लेखी माहिती घेणे उत्तम राहील. सप्टेंबर 2026 मध्ये टियागो ईव्हीवर मिळणारी1.45 लाखांपर्यंतची सूट इलेक्ट्रिक कार खरेदीदारांसाठी पर्वणी ठरू शकते.
या ऑफरमुळे तुमची कार खरेदी करताना पैसे वाचू शकतात. विशेषतः जे शहरात दररोज कार चालवतात त्यांच्यासाठी ही ऑफर भारी आहे.मात्र, अंतिम डील कार व्हेरिएंट, शहर आणि ग्राहकाच्या पात्रतेनुसार ठरवली जाईल.






Leave a Reply