• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Tanvi Kolte : रंग – रुपावरून हिणवलं… वडिलांच्या गंभीर आजारामुळे वाढल्या अडचणी… ‘धाकड गर्ल’ने गाजवलं ‘बिग बॉस’वर वर्चस्व

April 22, 2026 by admin Leave a Comment


‘बिग बॉस मराठी 6’ विनर तन्वी कोलते हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही… पण हे यश आणि प्रसिद्धी तिला एका रात्रीत मिळालेली नाही… यासाठी तन्वी गेल्या अनेक वर्षांपासून कठोर मेहनत घेत होती. रत्नागिरीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या तन्वीचे बालपण अगदी सामान्य होतं. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या तन्वी कोलते कोणत्याही गॉडफादर किंवा शिफारशीशिवाय ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश केला आणि स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली. करियरच्या सुरुवातील तन्वी हिला कायम रिजेक्शनचा सामना करावा लागला… रुप आणि रंगावरून तर तिला कायम ट्रोल करण्यात आलं… पण तिने कधीच माघार घेतली नाही. हळू – हळू तन्वी हिने मराठी कलाविश्वात स्वतःची भक्कम जागा निर्माण केली… ‘लक्ष्मी निवास’ या शोच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली.

तन्वी कोलते हिच्या करियरच्या सुरुवातीबद्दल सांगायचं झालं तर, करियरच्या सुरुवातीला तिला वडिलांच्या गंभीर आजाराचा सामना करावा लागला… या गोष्टीने तन्वी नक्कीच खचवली, पण त्याचबरोबर ती मानसिकदृष्ट्या अधिक कणखर देखील झाली. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आपली स्वप्ने यांच्यात तिने कसा समतोल साधला, याबद्दल ती अनेकदा दिलेल्या मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.

तन्वी कोल्टेचा जन्म 7 फेब्रुवारी 1998 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे झाला. सामान्य कुटुंबातून आलेल्या तन्वीने आपलं शिक्षण तिथेच पूर्ण केले, पण तिची स्वप्ने कायम मोठी होती. तन्वी 28 वर्षांची आहे. एवढंच नाही तर, तन्वी कोलते हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, तिच्या लग्नाबद्दल देखील अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत असतात, पण तन्वी हिने कोणासोबतच लग्न केलेलं नाही. एवढंच नाही तर, बिग बॉसमध्ये तन्वी हिने स्पष्ट केलं आहे की, ती सध्या रिलेशनशिपमध्ये नाही…

बिग बॉसच्या घरात तन्वीच्या धूम्रपानाच्या सवयीची बरीच चर्चा झाली होती. तिचं ‘व्यक्तिमत्व बनावट आहे’ यावरून तिला ट्रोलही करण्यात आले होते. पण तन्वी कोलते हिने कोणत्याच गोष्टीकडे लक्ष दिलं नाही, तिने फक्त तिच्या खेळाकडे लक्ष दिलं आणि बिग बॉस मराठी 6 या पर्वाची विजेती झाली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हे 3 सिक्रेट फुलझाड, खिडकीत लावल्यास घरातली दुर्गंधी जाईल पळून; फक्त एकदा लावा अन्…
  • तामिळनाडू आणि प.बंगालमध्ये मतांसाठी नोटा आणि दारुचा अक्षरश: पाऊस, एक हजार कोटींचा माल जप्त
  • सर्वात स्वस्त दारू! 1500 रुपयांची बॉटल फक्त 500 रुपयांना; नेमकी कुठे मिळते?
  • US, Iran Conflict : इराणचा गेम ओव्हर, ट्रम्प यांचा एक डाव अन् अमेरिका ठरली गेमचेंजर, आता युद्धात नव्या देशाची एन्ट्री
  • LSG vs RR Toss : लखनौचा फिल्डिंगचा निर्णय, वैभव सूर्यवंशी राजस्थानला 200 पार पोहचवणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in