
शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचं? यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु झालेली आहे. उद्धव ठाकरे गटाच्यावतीने ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद करत आहेत. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह देण्यात आलं, त्यावर कपिल सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. कपिल सिब्बल यांच्या मते या निर्णयाची चार भागात विभागणी करता आली असती. पहिल्या भागात शिवसेना पक्षात फूट पडली असा निष्कर्ष निवडणूक आयोगाने काढला. पक्षाच्या घटनेच्या आधारे हा वाद सोडवता येणार नाही असा निष्कर्ष निवडणूक आयोगाने काढला. विधिमंडळातील संख्येच्या आधारावर पक्ष आणि निवडणूक चिन्ह दिलं गेलं. विधिमंडळातील बहुमतावर पक्ष आणि निवडणूक चिन्ह दिलं गेलं हे मुद्दे कपिल सिब्बल यांनी मांडले.
(बातमी अपडेट होत आहे)
Leave a Reply