• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sonam Wangchuk : जिंकले म्हणून नाचले पण कॉकरोच जनता पार्टीच्या नेत्यांचं हे सर्व वागणं पाहिल्यावर सोनम वांगचूक स्पष्टपणे बोलले

July 28, 2026 by admin Leave a Comment


केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हे कॉकरोच जनता पार्टीचं मोठं यश आहे. त्यामुळे सीजेपीने या आंदोलनचा जोरदार सेलिब्रेश केलं. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. खरंतर या आंदोलनाला ओळख मिळाली ते सोनम वांगचूक यांच्यामुळे. ते 26 दिवस आमरण उपोषणाला बसले होते. सीजेपीच्या सेलिब्रेशनचे हे जे व्हिडिओ आता व्हायरल झालेत, त्यावर सोनम वांगचूक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वांगचूक यांनी सर्व समर्थकांना प्रतिमा, संयम आणि जबाबदारीने सेलीब्रेशन करण्याचं आवाहन केलं आहे. सोनम वांगचूक म्हणाले की, “विजयासोबत नम्रताही असली पाहिजे. त्यांनी समर्थकांना प्रतिमा, संयम आणि जबाबदारीने सेलिब्रेशन करण्याचं आवाहन केलं. यश मिळवणं जितकं महत्वाचं आहे, तितकीच सम्मान, विनम्रता ठेवली पाहिजे”

वांगचूक हे दिल्लीत जंतर-मंतरवर सीजेपीच्या नेतृत्वाखाली झालेल्या विद्यार्थी आंदोलनाचा मुख्य चेहरा होते. ते आमरण उपोषणाला बसलेले. आंदोलक विद्यार्थ्यांवर कारवाई न करणं, नीट पेपर लीकमुळे जीवन संपवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर 23 जुलै रोजी त्यांनी 26 दिवसाचं उपोषण सोडलं होतं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर लगेच सीजेपीच्या नेत्यांचे डान्स,सेलिब्रेशनचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावर अनेकांनी टीका केली. विद्यार्थ्यांनी जीवन संपवलं म्हणून आंदोलन करता आणि नंतर असं सेलिब्रेशन. हे संवेदनशीलता नसल्याचं लक्षण आहे अशी टीका काहींनी केली.

कोल्ड कॉफी पीत आयोजन करु शकतो

अनेक राज्यांमध्ये सर्वसामान्य आंदोलकांचं अटक सत्र सुरु आहे. त्यावेळी सीजेपीचं नेतृत्व सेलिब्रेशन करण्यात व्यस्त आहे अशी टीका अनेकांनी केली. सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकिल महेश जेठमालानी यांनी या सेलिब्रेशनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “सीजेपीचं नेतृत्व हॉटेलमध्ये विजयाची पार्टी करत आहे. दिल्लीत हिंसाचार झाल्यानंतर या तथाकथित युवा आंदोलकांनी म्यूझिक चालू केलं आणि डान्स सुरु केला. या सगळ्यांना आंदोलनादरम्यान प्रवास, जेवण, निवास, उपकरणं आणि लॉजिस्टिक्ससाठी कोणी फंड दिला?” सीजेपी प्रवक्ता सौरभ दास बोलला की, “या व्हिडिओमधून नव्या पिढीच्या भावना दिसतात. त्याने एक्सवर लिहिलं की, आम्ही रस्त्यावर पाहिजे तेवढा वेळ बसू शकतो. आम्ही नाचून विरोध करु शकतो. आम्ही कोल्ड कॉफी पीत आयोजन करु शकतो. ही पिढी आत्मविश्वासाने भरलेली असून रचनात्मक आणि जिद्दी आहे”

 

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CCTV फुटेज, रेकॉर्डिंग सगळं बाहेर काढेन; ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा थेट इशारा, म्हणाली ‘27.11.23’ची ती सकाळ आठवतेय?
  • Sugar Price Hike : साखरेचा भाव वाढताच प्रशासनाचा मोठा आदेश, आता 30 दिवसांपेक्षा जास्त काळ…सामान्यांवर काय परिणाम होणार?
  • IND vs SL : रवींद्र जडेजाने अखेर सूड घेण्यासाठी सात दिवस घेतले! श्रीलंकन खेळाडूसोबत काय घडलं होतं?
  • मराठी सक्तीविरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांची उच्च न्यायालयात धाव
  • मोठी बातमी! लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र होणार? वन नेशन वन इलेक्शनबाबत मोठी अपडेट!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in