
“विद्यार्थ्यांच आंदोलन आहे. त्यांच्या काही मागण्या आहेत. त्यासाठी सरकारने स्वीकारलेलं धोरणं कसं चुकीचं आहे? हे न्याय देवतेने स्पष्टपणे सांगितल. न्यायदेवतेने सरकारला कडक शब्दात सल्ला दिला आहे, तुम्ही योग्य पद्धतीने निर्णय घेतले नाहीत, तर आम्हाला निर्णय घ्यावे लागतील” असं शरद पवार म्हणाले. शिवसेनेच्या पक्ष, चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यावर विचारलं असता शरद पवार म्हणाले की, “नाही सांगू शकतं. कोर्टाचा निकाल येईल. सुनावणी चालू आहे. संपलेली नाही. त्याआधी आम्ही भाष्य करणं दोघांच्या हिताचं नाही. काय असेल ते कळेल” असं शरद पवार म्हणाले.
साखरेचे दर वाढले आहेत. त्यावर पवार म्हणाले की, साखर आयात करणं योग्य नाही. त्याचा फायदा आज काय होईल सांगता येत नाही. पावसाने शेतकऱ्याची चिंता वाढवली आहे. त्यावर पिण्याच्या पाण्याचा आणि बाकीचे प्रश्न आहेत असं पवार यांनी सांगितलं.FDA कारवाई वर म्हणाले की, दुधातली भेसळ थांबली. यामुळे दुधाचं उत्पादन कमी झालं. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सांगितलं की, ‘बघुया आता काय होतय, सकाळी काही मंत्री तिथे जाणार आहेत’
(बातमी अपडेट होत आहे)
Leave a Reply