• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सर्वसामान्यांना महागाईच्या झळा अन्… GDP च्या कौतुक सोहळ्याविरोधात शरद पवार मैदानात, सरकारची काढली खरडपट्टी

September 3, 2026 by admin Leave a Comment


भारताचा विकास वृद्धी दर (GDP) एप्रिल ते जून या तिमाहीत 7.8 टक्के इतका असल्याचे सरकारने जाहीर केले. एकीकडे महागाईचा भडका उडाल्याचे सांगत विरोधकांनी जीडीपीची ही आकडेवारी सपशेल खोटी असल्याचा दावा केला आहे. काँग्रेससह विरोधकांनी सरकारच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकार विकास दर वृद्धीवरून कौतुक सोहळा साजरा करत असताना विरोधकांनी मोर्चा उघडला आहे. या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ही उडी घेतली आहे. त्यांनी सरकारला वस्तुस्थितीची जाणीव करून देत चांगलेच खडसावले आहे.

शरद पवार यांनी टोचले सरकारचे कान

देशाचे अर्थमंत्री आणि प्रधानमंत्री अर्थव्यवस्थेची स्थिती अतिशय सुंदर आहे, असं भासवायचा प्रयत्न करत आहेत. मूळ जे दुखणं आहे हे त्यांच्या लेखी नाही. अर्थव्यवस्था खाली जाते याची नोंद त्यांनी घेतलेली नाही, असं दिसतंय अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी प्रधानमंत्री आंतरराष्ट्रीय पातळीवर काही गोष्टी बोलत आहेत. आज इथली वस्तूस्थिती आहे ती एका दृष्टीने बाजूला ठेवली आहे. तुमच्या खिशातून पैसे जास्त जातील. तुम्हाला महागाईच्या झळा बसतील, असे भाष्य पवार यांनी केले.

काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी जीडीपीवरून सरकारला घेरले आहे. जीडीपी मोजण्याच्या नवीन पद्धतीवरून त्यांनी सरकारवर टीका केली आहे. केरळ काँग्रेसने सोशल मीडियावर एक पोस्ट करत जीडीपीवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. बिअरच्या मगचे उदाहरण देत जीडीपीवरून सरकारवर निशाणा साधला आहे. या फोटोत भारतीय अर्थव्यवस्थेला बिअरच्या रुपात तर GDP आकेडवारीला बिअरवरील फेसाच्या रुपात दर्शवले आहे. महागाईने जनतेचे कंबरडे मोडले असताना जीडीपीची फसवी आकडेवारी समोर करत सरकार नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

सरकारचा विरोधकांवर पलटवार

देशाच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) भारताचा विकास वृद्धी दर 7.8 टक्के असल्याचे जाहीर केले. त्यावर माजी वित्त सचिव सुभाषचंद्र गर्ग आणि इतर काही अर्थतज्ज्ञांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी जीडीपी गणना आणि मोजणी पद्धतीवर आक्षेप घेतला आहे. गेल्या काही वर्षात त्यात सरकारने बदल केल्यानेच ही आकडेवारी फुगल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.

तर मोदी सरकारामधूनही विरोधकांवर टीकेचे बाण सोडण्यात येत आहे. काँग्रेस सध्या नशेच्या गर्तेत आहे. त्यांना भारतीय विकासाचे वावडे आहे. देशाची प्रगती काँग्रेसला सहन होत नसल्याचा दावा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. तर सांख्यिकी विभागानेही सरकारच्या वतीने विरोधकांच्या आक्षेपांवर उत्तर दिले आहे. पण त्याने विरोधकांचे समाधान झालेले नाही. सरकार आकडेवारीचा खेळ करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune | पुण्यात DJविरोधक विद्यानंद बापट यांना मारहाण! tv9 मराठीशी बोलत असतानाच तरुणाने केला हल्ला
  • Vidyanand Bapat: पुण्यामध्ये भाजपची दादागिरी…विद्यानंद बापट मारहाणप्रकरणी प्रशांत जगताप भडकले
  • Pune Vidyanand Bapat : ‘मला आधी त्याच्या दोन वाजवू द्या, तुला कोणी..’ विद्यानंद बापटांवर हल्ला करताना तो तरुण काय बोलत होता?
  • पुण्यात डीजेविरोधी भूमिका मांडणाऱ्या विद्यानंद बापटांना कॅमेऱ्यासमोरच झापड; असीम सरोदे संतापले
  • Maratha Andolan Jalna | मराठा आंदोलनात धक्कादायक घटना! अंतरवाली सराटीत आंदोलकाने जीव गमावला; नेमकं घडलं काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in