
पुण्यामध्ये डीजेच्या दणदणाटाला विरोध करणारे कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. गणेशोत्सवामध्ये डीजे नको अशी भूमिका सातत्याने मांडणाऱ्या बापट यांना काही तरुणांनी टिळक रोड परिसरात मारहाण केली. विशेष म्हणजे, ते टीव्ही ९ मराठीशी बोलत असतानाच ही घटना घडली.
बापट यांनी डीजेमुक्त गणेशोत्सवाची भूमिका वारंवार मांडली आहे, ज्यामुळे ते सोशल मीडियावरही चर्चेत आहेत. त्यांच्या या भूमिकेला काही पुणेकरांनी पाठिंबा दिला आहे, तर काहींनी विरोधही दर्शवला आहे. मारहाण करणाऱ्या तरुणांनी ‘आमच्या गणेशोत्सवाला विरोध का करता’ असे म्हणत आक्रमक पवित्रा घेतला. या घटनेनंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, विद्यानंद बापट हे पोलिसांत तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Leave a Reply