• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Pune Vidyanand Bapat : ‘मला आधी त्याच्या दोन वाजवू द्या, तुला कोणी..’ विद्यानंद बापटांवर हल्ला करताना तो तरुण काय बोलत होता?

September 3, 2026 by admin Leave a Comment


पुण्यात गणेशोत्सवात चालणाऱ्या DJ च्या दणदणाटावर दोन गट पडले आहेत. एक डीजे समर्थक आणि दुसरा डीजे विरोधक. यात डीजेविरोधात आवाज उठवण्यात आघाडीवर असलेल्या विद्यानंद बापट यांच्यावर आज हल्ला झाला. टीव्ही 9 मराठीच्या शो मध्ये बोलत असताना विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाला. अचानक धावत आलेल्या काही जणांनी विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला केला. “तुला कोणी ऑब्जेकशन घ्यायला सांगितलय. मला आधी त्याच्या दोन वाजवू द्या. पुणेकरांबद्दल तुला कोणी..” असं हा हल्लेखोर बोलतानाचे शब्द स्पष्टपणे ऐकू येत आहेत.

हल्ला झाल्यानंतर पुणे पोलीस स्टेशनमध्ये विद्यानंद बापट टीव्ही 9 मराठीशी बोलले. “तुम्ही साक्षीदार आहात. तुम्हाला माहित आहे. तुम्ही विचारत असताना एक वेडा आला त्याने हल्ला केला. मी सशस्त्र नव्हतो. पोलीसही तिथे नाहीत हे बघून त्याने हल्ला केला” असं विद्यानंद बापट म्हणाले. आताही टेक्निकली पोलिसांकडे बंदूक नाहीय. त्याला सवंग प्रसिद्धी हवी होती असं बापट म्हणाले. तरुणांचं म्हणणं आहे की, अशा पद्धतीने भूमिका मांडून तुम्ही गणेशोत्सवाला विरोध करताय. त्यावर विद्यानंद बापट म्हणाले की, फुटेज तुमच्याकडे आहे. फुटेज बघून पोलिसांना तुडवून काढूं दे. मुद्याचं उत्तर मुद्याने द्यायचं असतं. गुद्याने द्यायचं नसतं. ते पोलिसांचं काम आहे, ते त्यांचं काम करतील.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • DJ विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापट यांना कॅमेऱ्यासमोरच हाणलं, नीलम गोऱ्हे यांचा संताप, शिंदे सेना जशाच तसे उत्तर देणार?
  • आता मुंबई-पुण्याला बिनधास्त वडापाव, बाकरवडी खायला जा… वैष्णव यांच्याकडून मुंबई- पुणे बुलेट ट्रेनची घोषणा
  • Vidyanand Bapat : डीजेविरोधात बोलताना विद्यानंद बापटला हाणलं, Tv9 मराठीशी बोलताना घडली घटना
  • विद्यानंद बापटांना मारहाण, सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या, अमित शाहांनाच फोन…
  • Raghuram Rajan: आकड्यात गडबड…मोदी सरकारच्या GDP ग्रोथवर माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचा सवाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in