• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

DJ विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापट यांना कॅमेऱ्यासमोरच हाणलं, नीलम गोऱ्हे यांचा संताप, शिंदे सेना जशाच तसे उत्तर देणार?

September 3, 2026 by admin Leave a Comment


डीजे आणि गणेशोत्सवातील गोंगाटाविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांना tv9 मराठीशी बोलताना मारहाण करण्यात करण्यात आली. त्यानंतर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. अनेकांनी या मारहाणीचा निषेध केला आहे. अनेकांनी बापट यांना समर्थन जाहीर केला आहे. त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. बापट यांनी सुद्धा यावर अत्यंत संयत प्रतिक्रिया दिली आहे. सवंग प्रसिद्धीसाठी हा प्रकार केल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिलेदार आणि विधान परिषदेच्या माजी उपसभापती, आमदार नीलम गोऱ्हे यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ही तर लांछनास्पद गोष्ट

विद्याधर बापट यांना मारहाण झाली ही लांछनास्पद गोष्ट आहे. मी त्यांना फ़ोन करून विचारपूस करून त्यांची भेट घेणार आहे. बापट यांच्या डीजे विरोधातील भूमिकेशी मी सहमत आहे. ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मोठी मागणी नीलमताई गोऱ्हे यांनी केली. त्यामुळे शिंदे सेना मारहाण करणाऱ्याला जशाच तसे उत्तर देणार का? असा सवाल पुणेकर करत आहेत.

मारहाण करणे चुकीचे

DJ संदर्भात एका लिमिट पेक्षा जास्त आवाज वाढवला गेला तर त्याचा नकीच त्रास होतो. लहान बालक असतील किंवा कानाच्या पडद्यांना त्रास होतो. यावर एक निर्बंध लावले पाहिजे, अशी मोठी मागणीही गोऱ्हे यांनी केली. विद्याधर बापट यांना अशा पद्धतीत मारहाण करणे चुकीचे आहे . त्यांचा स्वत:चा हा आवाज आहे. संयम बाप्पा कडून यांनी शिकले पाहिजे. स्वत:चे वर्चस्व दाखवण्याचे प्रयत्न करत असतील तर लोकांना यात पुढे ठेवू नये, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

एमपीएससी पेपरफुटीची लवकर चौकशी व्हावी

MPSC या परीक्षेत पेपर फुटल्यामुळे चौकशीला सुरुवात झाली आहे. पुण्यात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. मुंबईत देखील अनेक मुलांचे फोन आणि मॅसेज येत आहेत. यात जे कोण आरोपी आहेत यांनी लॅपटॉप खाडीत टाकले ऋतुजा पाटील आणि इतर आरोपी यांचे फोन खराब असल्याचे सांगितलं. अभिजित लेंडवे यांची काही पेपरवर स्वाक्षरी होती. एमपीएससी संदर्भातील चौकशी लवकरच व्हावी यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना निवेदन दिले आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देखील मुलांशी भेट घेऊन काही गोष्टी समजून घेतल्या आहेत. परीक्षा झाल्यानंतर निकाल लगेपर्यंत गोष्टी समजून घेतल्या. तर स्मार्ट कार्ड देऊन एक दोन टप्यात त्यांना लाभ घेता येईल. कन्या योजनेत आम्ही काही गावातील मुलींना ट्रेनिंग दिली जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. दिशा सालियनप्रकरणात खूप वर्षांनी कुटुंबाचा आवाज कोर्टात पोचला आहे. नक्कीच यात पुरावे सापडतील आणि दिशा व तिच्या कुटुंबाला न्याय मिळेल, असे भाष्य नीलम गोऱ्हे यांनी केले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Suyog Rajnekar | गरिबांच्या लेकरांचा घास चोरला जातोय! MPSC पेपरफुटीवर तरुणाची हृदयस्पर्शी कविता व्हायरल; रोहित पवारांनीही केली शेअर
  • 1994पासून आजपर्यंत काय करताय? मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांचं स्पष्ट मत, एका विधानानेच…
  • ठाण्यात आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी विश्वविक्रमासाठी सज्ज
  • सामान्य गाड्यांपेक्षा EV चे टायर लवकर गुळगुळीत का होतात? ‘हे’ कारण तुम्हाला माहीत आहे का? अशी घ्याल काळजी
  • Swara Bhasker: स्वरा भास्करची जीभ छाटणाऱ्याला 1.51 लाखांचं बक्षीस; ‘जौहर’च्या वक्तव्यावरून संतापाचा उद्रेक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in