• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

स्वामी समर्थ मठातून पादुकांची चोरी, भाविकांमध्ये संतापाची लाट

September 3, 2026 by admin Leave a Comment


राज्यात चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. घर, बंगल्यानंतर आता मंदिरातही चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. मागील अनेक वर्षांत मंदिरातून मूर्ती, दानपेटी चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. आता थेट चांदीच्या पादुका चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. स्वामी समर्थ मठातून चक्क चांदीच्या पादुका चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. रायगडमधील खालापूर शहरात हा प्रकार घडला आहे. खालापुरातील स्मामी समर्थ मठातून पादुका चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. पादुका चोरीच्या घटनेने भाविकांमध्ये एकच संपात व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगडच्या खालापूर शहरातील नव्याने बांधण्यात आलेल्या स्वामी समर्थ मठातून चक्क चांदीच्या पादुका चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. तब्बल ६५६ ग्रॅम वजनाच्या आणि सुमारे १ लाख ६० हजार रुपये किमतीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी लंपास केल्याचे उघडकीस आलं आहे. पुजारी संतोष सावंत हे बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे मठात पूजा करत असताना, साडेसातच्या सुमारास चोरट्याने संधी साधल्याचे उघडीस आलं आहे.  पुजारी तळमजल्यावर पूजा करण्यासाठी गेले. त्यावेळी चोरट्याने पहिल्या मजल्यावरील चांदीच्या पादुका उचलल्या आणि दुचाकीवरून पोबारा केल्याचे समोर आलं.

मठातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयित दुचाकीवरून येऊन टेहळणी करताना दिसून आले आहेत. दोघांनीही तोंडाला रुमाल बांधल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यातील एकाने डोक्यावर टोपी घातली होती. चांदीच्या पादुका चोरीला गेल्याची माहिती मिळताच भाविकांनी तातडीने मठाकडे धाव घेतली. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. स्वामींच्या पादुकाच चोरीला गेल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

गोंदियात चोरीच्या उद्देशातून हत्येचा संशय

गोंदियाच्या पळसगाव राका येथे 82 वर्षीय वृद्ध महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. घरातून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. चोरट्यांनी हातातील सोन्याच्या पाटल्या, एकदानी आणि दागिने गायब केले आहेत. त्यांनी आलमारी फोडल्याचे आढळले आहे. चोरीच्या उद्देशातून महिलेची हत्या केल्याचा संशय आहे. या घटनेनंतर गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सर्वोत मोठी बातमी ! फडणवीस उपपंतप्रधान व्हावेत, ही संघाची भूमिका; राऊतांचा सर्वात मोठा दावा
  • Vikhe Patil | विखे पाटलांचा शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला; 1994चं पाप… म्हणताच पवारांचा सत्तेत असल्याची आठवण करून पलटवार
  • TMKOC: न्यूयॉर्कच्या गगनचुंबी इमारतीवर ‘तारक मेहता’ची टीम; भिडे-बबिता-माधवीचा अंदाज पाहून चाहतेही खुश
  • अजितदादांच्या अपघाताबाबत नाना पटोलेंचं मोठं विधान, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या भूमिकेवरही महत्त्वाचं बोलले
  • Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेचं पहिलं प्रेम समोर, फोटो शेअर करत दिली जाहीर कबुली.. तिच्या बाजूला उभं राहून..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in