• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rain Alert: आनंदवार्ता! आकाशात काळ्या ढगांची शाळा, या जिल्ह्यांना पावसाचा तडाखा, 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट

September 3, 2026 by admin Leave a Comment


IMD Weather Update 3 September 2026: देशातील उत्तरी भागासह महाराष्ट्र आणि दक्षिणेतील राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशातील 19 राज्यांना पावसाचा फटका बसणार आहे. महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान अनेक राज्यात ताशी 60 ते 65 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहिल. उत्तर भारतातील अनेक ठिकाणी प्रशासनाने खबरदारी घेत 20 हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, देशात मान्सून सक्रिय झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसणार आहे.

आकाशात ढगांची शाळा

देशात एल निनोच्या प्रभावामुळे वातावरणात सतत बदल दिसत आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठा ब्रेक घेतला. अनेक भागात पावसाचा टिपूसही पडला नाही. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला. मराठवाड्यासह अनेक भागात दुष्काळाचे सावट तयार झाले. पण गेल्या दोन दिवसांपासून आकाशात ढगांची शाळा भरली आहे. मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यात रिमझिम पावसाने हजेरी लावली. मध्य भारतात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी विदर्भासह राज्यातील अनेक भागात पावसाची जोरदार बॅटिंग दिसू शकते. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जनजीवन प्रभावित होण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्यातील अकरा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा कमी जोर असेल. IMD च्या इशाऱ्यानुसार, अमरावती आणि गोंदिया जिल्ह्याला पावसाचा तडाखा बसू शकतो. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दोन्ही जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

ऊन-पावसाचा खेळ

राज्यातील अनेक भागात ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळू शकतो. काही भागात पावसाचा कमी जोर असेल. काही भागात पावसाचा लपंडाव दिसेल. विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी बरसतील. मध्य भारतात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने विदर्भासह मराठवाड्यातील काही भागात पावसाचे आगमन होईल. येत्या काही दिवसात राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Suyog Rajnekar | गरिबांच्या लेकरांचा घास चोरला जातोय! MPSC पेपरफुटीवर तरुणाची हृदयस्पर्शी कविता व्हायरल; रोहित पवारांनीही केली शेअर
  • 1994पासून आजपर्यंत काय करताय? मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांचं स्पष्ट मत, एका विधानानेच…
  • ठाण्यात आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी विश्वविक्रमासाठी सज्ज
  • सामान्य गाड्यांपेक्षा EV चे टायर लवकर गुळगुळीत का होतात? ‘हे’ कारण तुम्हाला माहीत आहे का? अशी घ्याल काळजी
  • Swara Bhasker: स्वरा भास्करची जीभ छाटणाऱ्याला 1.51 लाखांचं बक्षीस; ‘जौहर’च्या वक्तव्यावरून संतापाचा उद्रेक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in