• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Shapoor Zadran : अफगाणिस्तानच्या वेगवान गोलंदाजाची प्राणज्योत मालवली, वयाच्या 38व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

July 7, 2026 by admin Leave a Comment

Shapoor Zadran Passes Away: अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शपूर जाद्रान याचं निधन झालं आहे. त्याच्या निधनामुळे क्रीडाविश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. जाद्रानला गेल्या काही वर्षापासून इम्यून सिस्टमशी निगडीत गंभीर आजार होता. शपूर झाद्रान ‘हेमोफॅगोसाइटिक लिम्फोहिस्टिओसाइटोसिस’ (HLH) नावाच्या एका गंभीर आजाराशी झुंज देत होता.त्याच्या या आजाराशी गेल्या काही वर्षांपासून लढा सुरू होता. गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली एनसीआरच्या एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपुष्टात आली. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याच्या निधनाची माहिती एक्स या सोशल मीडिया खात्यावर दिली आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने व्यक्त केला शोक

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने शपूर जाद्रानच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. इतकंच काय तर त्याच्या क्रिकेटमधील योगदानाच्या आठवणी ताज्या केल्या. एसीबीने लिहिलं की, क्रिकेटप्रती शपूर जाद्रानची असलेली आवड आणि समर्पण प्रशंसनीय होते. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये या खेळाला प्रोत्साहन मिळण्यास मदत झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर अफगाणिस्तानला ओळख मिळवून देणाऱ्या पहिल्या क्रिकेटपटूंपैकी एक होता, असे गौरवोद्गारही काढले. शापूर जाद्रान याने केवळ क्रिकेटच्या मैदानावरच मोठे यश मिळवले नाही, तर ते अनेक अफगाण क्रिकेटपटूंसाठी प्रेरणाही ठरला.

إِنَّا لِلّهِ وَإِنَّـا إِلَيْهِ رَاجِعُونَ

With profound grief and deep sorrow, the Afghanistan Cricket Board mourns the passing of former Afghanistan fast bowler Shapoor Zadran.

Shapoor Zadran was one of the foundation-laying figures of Afghanistan cricket, whose dedication,… pic.twitter.com/iPIAJ6HLkq

— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) July 7, 2026

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एका निवेदनात म्हटले आहे की, शापूरने अफगाणिस्तानच्या तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्याचा मार्ग दाखवला. त्यांनी त्यांच्यामध्ये अफगाण क्रिकेटमध्ये भविष्य घडवण्याचा आत्मविश्वास निर्माण केला. शापूर जाद्रान अफगाणिस्तान क्रिकेटसाठी एक दशकाहून अधिक काळ खेळला. त्याने 11 वर्षे अफगाणिस्तानसाठी क्रिकेट खेळले. त्याने 2009 मध्ये अफगाणिस्तान संघात पदार्पण केलं होतं. त्यानंतर 2020 मध्ये त्याने शेवटचा सामना खेळला. या दरम्यान शापूर जाद्रानने 44 वनडे, 36 टी20 सामने खेळले. त्याने 44 वनडे सामन्यात 43 आणि 36 टी20 सामन्यात 37 विकेट काढले.

वनडे वर्ल्डकप 2015 च्या स्पर्देत स्कॉटलंडचा पराभव करून अफगाणिस्तानने आपला पहिला विश्वचषक सामना जिंकला होता. त्या सामन्यातील अफगाण संघाच्या विजयात शपूर जाद्रान हिरो होता. त्याने 10 षटकात 38 धावा देऊन 4 बळी घेतले.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मला मेंटली टॉर्चर केलं जातंय..; दिपाली सय्यद यांचा रुपाली चाकणकरांवर मोठा आरोप, अजितदादा असते तर..
  • घरातील किचनमध्ये झुरळ दिसले तर किचनच बंद करतो का? थेट तुकाराम मुंडे यांनाच विचारला सवाल..
  • गुजरात ते मुंबई ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश, 30 लाखांच्या ड्रग्जसह माजी कॅबिन क्रू मेंबर अटकेत
  • हॉटेलमध्ये भेटू, तू चांगली दिसतेस; ग्राम महसूल अधिकाऱ्याचे भयंकर कृत्य; डर्टी WhatsApp चॅट समोर
  • Marathi Langugae Row : ‘ही शेवटची नम्र विनंती’, दादागिरी करणाऱ्या अमराठी मुजोर रिक्षा चालकांना प्रेमाने समजावण्याचा मनसेचा शेवटचा प्रयत्न

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in