• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sanju Samson: मला आता खेळायचंच नाहीये… भारत इंग्लंड टी-20 मालिका सुरु असताना संजू सॅमसनचा मोठा निर्णय, असं का म्हणाला?

July 10, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या सामन्यातील चौथा सामना पार पडला जो इंग्लंड संघाने जिंकला. 9 विकेट्सने सामना जिंकून मालिकाही जिंकलीच आहे. या मालिकेत भारतीय संघाला विशेष प्रदर्शन दाखवता आलेले नाही. संघातही अनेक बदल झालेले पाहायला मिळाले. वैभव सूर्यवंशीला पर्दापण मिळाले तर संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर वगळावे लागले. आता या दरम्यान संजू सॅमसननेच खेळायचे नाही अशी इच्छा व्यक्त केली आहे.

संजू सॅमसन वैयक्तिक कारणांमुळे केरळ क्रिकेट लीग 2026 मध्ये खेळणार नाही. कोची ब्लू टायगर्सने यापूर्वी सॅमसनला आपल्या रिटेन्शन लिस्टमधून वगळले होते आणि आता त्याला 156 खेळाडूंच्या लिलावाच्या यादीतूनही वगळण्यात आले आहे. असे वृत्त आहे की, सॅमसनने स्वतः लिलावात सहभागी होण्यास नकार दिला आहे. गेल्या वर्षी, कोची ब्लू टायगर्सने संजू सॅमसनला 26.80 लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते, ज्यामुळे तो केसीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. केसीएल 2025 मध्ये, सॅमसनने केवळ पाच डावांमध्ये 368 धावा केल्या होत्या.

स्पोर्टस्टारच्या वृत्तानुसार, केसीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष नझर मचन यांनी सांगितले की, संजू सॅमसनने केरळ क्रिकेट लीगच्या अधिकाऱ्यांना आणि कोची ब्लू टायगर्सला कळवले आहे की तो केसीएलच्या तिसऱ्या हंगामात सहभागी होणार नाही. त्यामुळे, कोची ब्लू टायगर्सने त्याला संघातून मुक्त करण्याचा घेतलेला निर्णय आश्चर्यकारक नाही. केरळ क्रिकेट लीगचा तिसरा हंगाम 20 ऑगस्ट रोजी सुरू होईल आणि अंतिम सामना 5 सप्टेंबर रोजी होणार आहे.

संजू सॅमसन सध्या टीकेचा धनी झाला आहे. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या त्याच्या शेवटच्या तीन सामन्यांमध्ये सॅमसनला केवळ 6 धावा करता आल्या. परिणामी, इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. त्याच्या जागी वैभव सूर्यवंशीला संधी देण्यात आली. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी अलीकडेच सांगितले की, “संजू सॅमसनला वगळले याचा अर्थ असा नाही की तो संघात परत येऊ शकत नाही.” आता चौथा टी-20 सामनाही पार पडला त्यात संजूला जागा मिळालेली नाही त्यामुळे आता उर्वरित एक सामन्यात तरी संजूला जागा मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • चौथी पासांसाठी खुश खबर, थेट सरकारी नोकरी, मुंबई हायकोर्टातच व्हा भरती, पटापट करा अर्ज
  • नाशिकच्या कुंभमेळ्याच्या खर्चातील 0.1 टक्के…; संजय राऊतांकडून न्यायमूर्ती वराळेंचं कौतुक, पण मनातलंही बोलूनही दाखवलं
  • Bigg Boss फेम भजन सम्राट वयाच्या 73 व्या वर्षी उरकणार चौथं लग्न? म्हणाले, ‘3 लग्न करण्यास मनाई नाही, पण बायका ठेवण्यास…’,
  • चपाती लगेच कडक होते? फुगत नाही? कणिक मळताना करताय या चुका
  • ‘अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुजं…’, भडकला अभिनेता, पोस्ट करत म्हणाला, ‘घाई तरी कसली…’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in