• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Bigg Boss फेम भजन सम्राट वयाच्या 73 व्या वर्षी उरकणार चौथं लग्न? म्हणाले, ‘3 लग्न करण्यास मनाई नाही, पण बायका ठेवण्यास…’,

August 25, 2026 by admin Leave a Comment


झगमगत्या विश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी साठी – सत्तरीनंतर संसार थाटला आणि नव्या आयुष्याची सुरुवात केली. आता बिग बॉस फेम भजन सम्राट अनुप जलोटा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहे. अनुप जलोटा कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळेच चर्चेच असतात. आता त्यांनी त्यांच्या तीन लग्नांबद्दल मोठा खुलासा केला. ज्यामुळे अनुप जलोटा चौथं लग्न करणार का? अशा चर्चांनी जोर धरला आहे. सांगायचं झालं तर, अनुप जलोटा यांचे दोन घटस्फोट झाले आणि त्यांच्या तिसऱ्या बायकोचं निधन आजारपाणामुळे झालं.

लग्नांबद्दल काय म्हणाले अनुप जलोटा?

एका शोमध्ये अनुप जलोटा म्हणाले, ‘माझं पहिलं लग्न फार चांगलं होतं. पण चार वर्षांनंतर नातं थोडं त्रासदायक झालं. माझी बायको माझ्याच एका सहकाऱ्यासोबत निघून गेली. ती गेल्यानंतर माझ्या वडिलांनी सांगितलं, माझी एक विद्यार्थी आहे तिच्यासोबत लग्न कर. मी देखील ठीक आहे म्हणालो, पण एका वर्षातच आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला.’

तिसऱ्या लग्नाबद्दल अनुप जलोटा म्हणाले, ‘माझं तिसरं लग्न फार चांगलं झालं. आम्ही जवळपास 21 वर्ष एकत्र राहिलो. पण तिचं हृदय निकामी झालं. आम्ही अमेरिकेत जाऊन उपचार घेतले. त्यानंतर ती 13 वर्ष जगली. अखेर तिची प्रकृती नाजूक झाली आणि अचानक तिचं निधन झालं. आता माझा मुलगा 30 वर्षांचा झाला आहे.’

‘माझा मुलगा अमेरिकेतच राहतो. त्याने मला सांगितलं, तीन लग्न करण्यास मनाई नाही. पण तीन बायका ठेवण्यास मनाई आहे. मी एकावेळेस एक लग्न केलं आहे. जेव्हा घटस्फोट झाला तेव्हा दुसरं लग्न केलं आणि दुसरं लग्न मोडल्यानंतर तिसरं लग्न केलं… लग्न करण्यास काही हरकत नाही. पण तुमच्या नशिबात आहे की, तु्म्हाला पार्टनर कसा भेटेल?’ असं देखली जलोटा म्हणाले.

पुढे जलोटा म्हणाले, ‘राजा दशरथ यांचे देखील तीन लग्न झालेले. जेव्हा भगवान राम यांनी माता सीता यांच्यासोबत लग्न केलं. तेव्हा ते म्हणाले, मी एक नवीन प्रथा सुरु करत आहे. या प्रथेनुसार, आता आपण एकत विवाह करु शकणार आहोत. तेव्हापासून एकाच विवाहाची प्रथा सुरु झाली.’

अनुप जलोटा यांना असं देखील विचारण्यात आलं की, ‘आता पुन्हा लग्न करणार का? ‘आमिर खान त्याच्या जागी योग्य आहे का?’ यावर जलोटा म्हणाले, ‘तो मुस्लीम आहे, त्याची गोष्ट पूर्णरणे वेगळी आहे. त्यांनी तीन लग्न करण्याची परवानागी आहे.’, सध्या सर्वत्र अनुप जलोटा यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Onion Crisis : पुन्हा हिमालयासाठी सह्याद्री धावला… महाराष्ट्र देणार दिल्लीला 840 टन कांदा; थेट कांदा एक्सप्रेस…
  • Gen Z विद्यार्थ्यांनंतर आता Gen Z क्रिकेटरचंही आंदोलन, 250 हून अधिक तरुण रस्त्यावर उतरले, कारण काय?
  • केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, साखरेच्या आयातीच्या नियमात थेट बदल..
  • WhatsApp हॅकिंगचा धक्कादायक प्रकार, कुरिअरच्या कॉलपासून खेळ सुरू; सुप्रिया सुळे, वनिता खरात यांच्या प्रकरणांनी वाढवली चिंता
  • Shugar Rate : साखरेच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी सरकारने अचानक बदलला हा नियम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in