
दिवाळीमध्ये साखरेचे भाव 100 रुपये प्रति किलोपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. खुल्या बाजारात साखरेचा दर 80 रुपयांवर पोहोचला आहे. सतत साखरेचे दर वाढत आहेत. लोक साखरेचा तुटवडा होऊ शकतो, म्हणून मोठ्या प्रमाणात साखरेची खरेदी करत आहेत. यादरम्यान साठेबाजीविरोधात सरकारकडून पाऊले उचलली जात आहेत. याबाबत केंद्र सरकारकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत. देशात वाढणाऱ्या साखरेच्या दरावर वचक ठेवणे हे मोठे आवाहन आज सरकारपुढे उभे आहे. केंद्रातील सरकारने कच्च्या साखरेच्या आयातीबाबत नियमात सुधारणा केली आहे. शुद्ध केलेल्या साखरेवर दर दोन महिन्याने विकणे अनिवार्य केले. केंद्र सरकारने कच्च्या साखरेच्या आयातीशी संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत.
सरकारच्या माहितीनुसार, आयातदारांना आता बिल ऑफ एंट्री दाखल केल्यापासून दोन महिन्यांच्या आत कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून ती साखर म्हणून देशांतर्गत बाजारपेठेत विकावी लागेल. हा एक अत्यंत मोठा निर्णय सरकारचा म्हणावा लागेल. दोन महिन्यातच साखर विकावी लागणार आहे. साखरेची होणारी साठेबाजी रोखण्यासाठी सरकारकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला.
31 ऑक्टोबर 2026 ही निश्चित मुदत होती. टॅरिफ रेट कोटा अंतर्गत 10 लाख मेट्रिक टन (MT) कच्च्या साखरेच्या आयातीबाबतच्या नियमांमध्ये मोदी सरकारने सुधारणा केली आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 20 जुलै रोजी साखरेचा भाव प्रति किलो 48.18 रुपये होता. 20 ऑगस्टपर्यंत त्याचा भाव वाढून प्रति किलो 55.70 रुपये झाला.
यावरून हे स्पष्ट होते की, एका महिन्यात साखरेच्या दरात प्रति किलो 7.52 रुपयांची साधारणपणे 15.6 टक्क्यांनी वाढला आहे. ही एक अत्यंत मोठी वाढ म्हणावी लागणार आहे. साखरेच्या वाढलेल्या दराबद्दल बोलताना केंद्रीय मंंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले की, त्पादनातील घटीबाबत सरकार चिंतेत आहे. इथेनॉलच्या मागणीमुळे साखरेचे उत्पादन घटल्याचे सांगितले जात आहे. यानंतर सरकारकडून याबाबत मोठे पाऊले उचलली जात आहेत. साखर खरेदीसाठी लोकांनी मोठी गर्दी केली. मोठ्या प्रमाणात साखर खरेदी केली जातंय.
Leave a Reply