• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अभिजीत दीपकेंच्या मनातील बेस्ट CM कोण? पटकन नाव सांगितलं, कारण देत म्हणाले…

August 25, 2026 by admin Leave a Comment


कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे पुन्हा एकदा शिक्षणाच्या मुद्दयांवर आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. येत्या 5 सप्टेंबर रोजी कॉक्रोच जनता पार्टी दिल्लीत धडकणार आहे. स्कूल ठीक करो अभियानासाठी अभिजीत दीपके आणि त्यांची टीम विविध शाळांना भेटी देताना दिसत आहे. याचदरम्यान, दीपके यांनी देशातील राजकीय घडामोडींवरही भाष्य केलं. त्यांनी त्यांच्या मनातील बेस्ट मुख्यमंत्री सांगितला.

एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमाला कॉक्रोच जनता पार्टीचे तीन प्रमुख चेहरे पोहोचले होते. यात कार्यक्रमादरम्यान ‘राऊंड फायर’ सुरू झाला. त्यावेळी देशातील सर्व बेस्ट पंतप्रधान कोण, असे विचारल्यानंतर त्यांनी जवाहलाल नेहरू यांचं नाव घेतलं. आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनीही सहमती दर्शवली.

बेस्ट मुख्यमंत्री कोण?

अभिजीत दीपके यांना सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री कोण, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अभिजीत दीपके म्हणाले, माझ्या नजरेत अनेक मुख्यमंत्री चांगले आहेत. एमके स्टॅलिन यांनी अर्थव्यवस्था खूप चांगल्यारितीने सांभाळली. पिनराई विजय यांनी केरळमध्ये शिक्षण आणि आरोग्य सेवेचे मॉडेल चांगल्या प्रकारे राबवले. दीपके पुढे म्हणाले, ‘दिल्लीत अरविंद केजरवाल यांनीही दिल्लीत शाळा आणि आरोग्य सेवा विभागात चांगली कामे केली आहेत. त्यांनी चांगले काम केलं तर चांगलेच केलं म्हणेन, असं प्रामाणिकपणे सांगेन’ .

सर्वोत्तम शिक्षणमंत्री कोण?

‘मला तसं वाटत नाही. देशातील प्राथमिक शिक्षणावर लक्ष केंद्रीत करण्यात आलेलं नाही. त्यामुळे शाळा सोशल मीडियावर दिसू लागल्या आहेत, असे दीपकेंनी सांगितले. तर आशुतोष रांका म्हणाले, ‘आपल्या देशात शिक्षणमंत्री कोण? हे माहीत नाही. ते पद आता तोट्याचं मानलं जात आहे. अनेक राज्यांत शिक्षण मंत्री आहेत. ते पद अजूनही शिक्षेसारखे मानले जात आहे. तुम्ही लोकांना विचारा, निम्म्या लोकांना राज्याचा शिक्षणमंत्री कोण आहे हे, माहीत नसेल’.

तत्पूर्वी, कॉक्रोच जनता पार्टीने सप्टेंबर महिन्यात दिल्ली शांततापूर्ण मार्गाने मार्च काढणार असल्याची घोषणा केली आहे. सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने मार्चची घोषणा केल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिक्षण दिनाच्या दिवशी हा मार्च इंडिया गेटपासून सुरू होईल. त्यानंतर दिल्ली पोलीस मुख्यालयाजवळ सांगता होईल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दोघी भाजपच्या नगरसेविका, महापौर तावडे आणि शिरवडकरांमध्ये वाजलं का? अमित साटम यांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
  • ऑस्ट्रेलियाने भारताला दिला धक्का, शेतकऱ्यांची वाढली चिंता; पाकिस्तानला झाला आनंद
  • साखर कारखान्याबाहेर सभासदांची झुंबड, स्मार्ट बाजारामध्ये साखरेबाबत मोठा निर्णय, 1 व्यक्तीला एकच..
  • Abhijeet Dipke: तू ये तर तुझा खेळ संपवून टाकतो आणि कायमचाच… अभिजीत दिपके यांना मिळाली धमकी
  • शाळेत हिजाब घालावा की घालू नये? कोर्टाचा मोठा निर्णय; थेट इस्लामचा उल्लेख

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in