
अख्खा देश गाजवणारं तरूणाईचं, सीजेपीचं आंदोलन, आता संपलं तरी खूप चर्चेत आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी यावरून केलेल्या एका वक्तव्यावरून मात्र चांगलीच खळबळ माजली आहे. आंदोलनामध्ये जे दगड वापरले गेलो होते, त्याच्यावरचे ठसे आधारकार्डशी लिंक केले जाणार असून त्याआधारे तपास केला जाणार आहे, असं ते म्हणाले. मात्र त्यांच्या विधानाने खळबळ माजली असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी या विधानाच समाचार घेत पाटील यांना शालजोडीतले लगावले आहेत. चंद्रकांत पाटील यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस मुख्यमंत्री फडणवीस यांनी करावी, त्यांना एखाद्या जागतिक विज्ञान विद्यापीठाचं कुलगुरू करता येईल का ते पहाव, असं म्हणत राऊतांनी पाटील यांना चिमटा काढला.
काय म्हणाले राऊत ?
चंद्रकांत पाटील जे बोलले, त्याबद्दल मी ते वाचलं. चंद्रकांत दादा हे उच्चशिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री आहेत. त्याच्यामध्ये विज्ञान वगैरे जे विषय येतात. चंद्रकांत पाटील यांनी हे जे नवं संशोधन केलं आहे, आंदोलनताल दगड, त्यावरचे ठसे आधारा कार्डला लिंक केलं जाईल, या त्यांच्या शोधाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोबेल पुरस्कार समितीला एक शिफारस केली पाहिजे. चंद्रकांत पाटील यांना या वर्षीचा विज्ञान व संशोधन या क्षेत्रातला नोबेल पुरस्कार द्यायला हवा, असं राऊत म्हणाले.
पाटील यांना एखाद्या जागतिक विज्ञान विद्यापीठाचं कुलगुरू करता येईल का, याचा शोध घेणं गरजेचं आहे. कारण इतका मोठा शोध आत्तापर्यंत कोणीही लावला नव्हता. दगडावरच्या हातांचे ठसे घेऊन, ते आधार कार्डला लिंक करायचे, आधार कार्डाच शोध केला ते नंदन निलेकणी जे आहेत, ते हा शोध ऐकून 2 दिवस कोमात गेले, काय करावं ते काही त्यांना सुचत नाही. मला कसं नाही हे समजलं, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला.
बातमी अपडेट होत आहे.
Leave a Reply