
शिवसेना ठाकरे गटातून फुटून, उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत 6 खासदार सामील झाले. राज्याचं राजकारण हादरवणाऱ्या या घटनेतील एक खासदार संजय दिना पाटील आणि संजय राऊत यांच्यातील वादााची सध्या सगळीकडे चर्चा आहे. त्यातच संजय राऊत यांनी संजय दिना पाटील यांच्याविरोधात लेटर बॉम्ब टाकला. राऊतांनी डायरेक्ट मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहीलं असून त्यात संजय दिना पाटील यांच्यावर अनेक आरोप केलेत. त्यांच्यावर कारवाईची देखील मागणी केली. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच पेटलं असून आता खासदार संजय़ दिना पाटल यांनी राऊतांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. माध्यमांशी बोलताना संजय पाटील हे चांगलेच चिडलेले दिसले.
मी काही चूक केली असेल तर…
मी खुलेआम बोललो आहे ना, कारवाई होऊ दे ना. मी जर काही चूक केलं असेल तर पोलीस कारवाई करतील, मी चौकशीला तयार आहे, असं संजय दिना पाटील म्हणाले. माझं शिवसैनिकांसोबत काहीही घेणं देणं नाही, मी हे पहिल्यापासून बोलतोयं. शिवसैनिकांचे माझ्यावर उपकार आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या लोकांचे माझ्यावर उपकार आहेत की त्यांनी मला निवडून दिलं. एकदा नाही 3 वेळा निवडून दिलं, आमदार बनवलं, 2 वेळा खासदार बनवलं. माझं त्यांच्याशी काही वाकडं नाही, असं ते म्हणाले.
मी कशावर रिॲक्शन दिली जेव्हा ते म्हणाले, तुम्ही काही केलं तर आम्ही पाहून घेऊ. मी कशाला काय करू, मला काय पडलंय ? जेव्हा ते काही करतील तर आमची तयारी असेल, ते आले तर आम्ही काय मार खायचा ? असा सवाल त्यांनी विचारला. मला काही सेक्युरिटीची गरज नाहीये, त्यांना सेक्य़ुरिटीची गरज आहे. खोटी केस करून दाबून टाकली. ते मोठ लोक आहेत, मी पहिल्यापासून त्यांना मानसन्मान खूप दिलाय, असं ते म्हणाले.
Leave a Reply