• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Samay Raina : समय रैना पुरता गोत्यात, सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, ती एक चूक भोवली, थेट आदेश निघाला!

July 14, 2026 by admin Leave a Comment


Samay Raina : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कॉमेडियन समय रैना तसेच इतर चार विनोदवीरांना चांगलाच दणका दिला आहे. या सर्वांना 3 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. समय रैनासह यात विपुल गोयल, बलराज परमजीत सिंह घई, सोनाली ठक्कर आणि निशांत तंवर यांचा समावेश आहे. या सर्वांनीच दोन आठवड्याच्या आत आपला दंड कोर्टात जमा करावा, असा आदेश न्यायालयाने केला आहे. आदेशाचे पालन न केल्यास दंडाची रक्कम वाढू शकते, असेही न्यायालयाने समय रैना तसेच इतर चौघांना बजावले आहे. समय रैना तसेच इतरांनी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याने त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.

मणक्याच्या एका गंभीर आजाराची खिल्ली उडवली

सरन्यायाधीश सूर्यकांत, जस्टिस जॉयमाला बागची आणि जस्टिस व्ही मोहन यांनी हा आदेश दिला आहे. एसएमए इंडिया फाऊंडेशनद्वारे एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत समय रैना तसेच इतर कॉमेडियन्सने मणक्याच्या एका गंभीर आजाराची खिल्ली उडवली. तसेच या आजाराशी पीडित असलेल्या एका व्यक्तीचीही त्यांनी खिल्ली उडवली. इंडियाज गॉट लेटेंट या कार्यक्रमात समय रैना तसेच सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर विपुल गोयल, बलराज परमजित सिंह घई, सोनाली ठक्कर, निशांत जगदीश तन्वर यांनी आक्षेपार्ह विनोद केले, असा आरोप या याचिकेत करण्यात आला होता.

दिव्यांगांनाही आपल्या शोमध्ये सहभागी करून घ्यावे

या याचिकेची दखल घेत नोव्हेंबर 2025 मध्ये न्यायालयाने समय रैना तसेच इतर विनोदवीरांना एक आदेश दिला होता. त्यांनी प्रत्येक महिन्याला दोन शो करावेत. या शोच्या माध्यमातून दिव्यांगांच्या उपचारासाठी आर्थिक महदत व्हायला हवी. या सर्वांनीच दिव्यांगांनाही आपल्या शोमध्ये सहभागी करून घ्यावे, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. याच आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे न्यायालयाने समय रैना तसेच इतरांना दंड ठोठावला आहे. दरम्यान, आता समय रैनाला तसेच इतर विनोदवीरांना दंड भरावा लागणार आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रूपाली चाकणकरांच्या रेस्टॉरंटमध्ये डान्सबार, हुक्का पार्लर… रुपाली ठोंबरेंचे खळबळजनक आरोप
  • 33 वर्षानंतर श्रीलंकन खेळाडूचं नशिब निघालं फुटकं, कोलंबोत एकदा नाही तर दोनदा पायावर मारली कुऱ्हाड
  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?
  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in