
भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर तसेच सध्या क्रिकेटच्या सामन्यांत समालोचन करणाऱ्या आकाश चोप्रा यांनी क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरबाबत एक रंजक अनुभव शेअर केला आहे.
सिडनी कसोटीदरम्यान घडलेला हा प्रसंग घडला होता. एका यूट्यूब मुलाखतीत आकाश चोप्रा यांनी हा किस्सा सांगितला आहे. सिडनी कसोटी सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये सचिन त्याच्या शेजारी बसला होता. त्यावेळी सचिनचा अॅबडॉमिनल गार्ड तुटला होता.
सचिनकडे अतिरिक्त गार्ड नव्हता. त्यामुळे सध्या सामना सुरू असताना सचिनला माझ्याकडून अॅबडॉमिनल गार्ड मागावे लागले, अशी आठवण आकाश चोप्रा यांनी सांगितली. त्यानंतर आकाश यांनी दिलेला गार्ड वापरून सचिन मैदानात उतरला होता.
त्याच सामन्यात सचिनने नाबाद 241 धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. डावानंतर सचिनने त्याला एक खास गोष्ट सांगितली. विशेष म्हणजे मी तो अॅबडॉमिनल गार्ड सिचनलाच देऊन टाकला, असेही आकाश यांनी आवर्जुन सांगितले.
दरम्यान, या सामन्यानंतर सचिन तेंडुलकरने मला मी एकही कव्हर ड्राईव्ह खेळला नव्हता, असं सांगितलं. मला अगोदर विश्वास बसला नव्हता. परंतु नंतर सचिनने सांगितलेली ती गोष्ट नंतर खरी निघाली, अशीही आठवण आकाश चोप्राने सांगितली.




Leave a Reply