
सीजेपीने ५ सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये एका शांततापूर्ण मोर्चाची घोषणा केली आहे. सरकारच्या आश्वासनांवरून तीव्र नाराजी व्यक्त करत, २५ जुलै रोजी दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा आरोप सीजेपीने केला आहे. हा मोर्चा इंडिया गेटपासून सुरू होऊन नवी दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत नेण्यात येणार आहे.
१८ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने एफआयआरची यादी मागूनही सरकारने याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका किंवा आश्वासन दिले नसल्याचा दावा सीजेपीने केला आहे. त्यामुळे सरकारने दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी सीजेपीने केली आहे. या आंदोलनात देशभरातील विद्यार्थी, युवा संघटना आणि तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सीजेपीकडून करण्यात आले आहे. सीजेपीच्या मते, सरकारच्या उदासीनतेमुळेच त्यांना हे आंदोलन छेडण्यास भाग पडले आहे. या मोर्चाद्वारे सरकारवर दबाव आणून त्यांना त्यांच्या आश्वासनांची पूर्तता करण्यास भाग पाडण्याचा सीजेपीचा प्रयत्न आहे.
Leave a Reply