• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही… स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?

July 4, 2026 by admin Leave a Comment


सचिन अहिर यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि पक्षांतराच्या राजकारणावर स्पष्ट भूमिका मांडत कार्यकर्त्यांच्या योगदानाचा मुद्दा उपस्थित केला आहे. TV9 मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ठाकरेंचे सहा खासदार फुटल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी रोखठोक शब्दांत आपली भूमिका मांडली.

मुलाखतीदरम्यान सचिन अहिर म्हणाले की, “जेव्हा इतर पक्षातील एखादा नेता आपल्या पक्षात येतो, तेव्हा त्याचे स्वागत केले जाते. मात्र, आपल्या पक्षातून कोणी दुसरीकडे गेले, तर त्याला नालायक म्हणणे योग्य नाही.” राजकारणात प्रत्येक व्यक्तीचे योगदान असते आणि त्याचा सन्मान झाला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना अहिर यांनी स्वतःच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत, “या समाजात आमचंही काहीतरी योगदान आहे. आम्ही सर्वजण जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते आहोत. आम्हाला कोणी क्रेनमधून आणून राजकारणात बसवलेले नाही,” असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर भर दिला.

यावेळी त्यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरही भाष्य केले. “आमच्या मागे ना ठाकरे आडनाव आहे, ना पवार आडनाव आहे. कोणत्याही राजकीय वारशाच्या जोरावर आम्ही काम करत नाही. आम्ही हाडाचे कार्यकर्ते आहोत आणि स्वतःच्या कष्टाच्या बळावर राजकारणात उभे आहोत,” असे सचिन अहिर यांनी ठामपणे सांगितले.

दरम्यान, सचिन अहिर यांच्या या वक्तव्यानंतर पक्षांतर, कार्यकर्त्यांचे योगदान आणि घराणेशाहीच्या राजकारणावर पुन्हा एकदा चर्चा रंगली असून, त्यांच्या विधानाची राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर
  • Dia Mirza: 500 पुरुषांसमोर काढावे लागले कपडे, दिया मिर्झाने सांगितला भयानक अनुभव
  • Govinda: जॉनी लिव्हरची मुलगी होणार गोविंदाची सून? व्हिडीओ पाहून शुभेच्छांचा वर्षाव, नेमकं काय खरं?
  • Kriti Sanon : भावाला काय बिकिनी घालून…, ट्रोल होणाऱ्या कृती सेनॉनवर महिला खासदाराने सधाला निशाणा, मॉर्डन कपड्यांचा वाद विकोपास
  • Khawadya Dongar : लग्नाच्या दुसऱ्या दिवशी… कुणालच्या वडिलांच बायको संगिताला नेमकं काय खटकलं? आत्याचा मोठा खुलासा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in