• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

RR vs SRH: 25 एप्रिलला काही तरी मोठं घडणार! वैभव सूर्यवंशीच्या प्रशिक्षकांच्या भाकीताने उत्सुकता शिगेला

April 23, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेतील 36व्या सामन्यात 36चा आकडा पाहायला मिळणार आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने येणार आहे. या स्पर्धेत हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा भिडणार आहे. पहिल्या सामन्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला 57 धावांनी पराभूत केलं होतं. आता त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी राजस्थान रॉयल्सकडे आहे. पण या व्यतिरिक्त एक द्वंद्व या सामन्यात दिसणार आहे. कारण या सामन्यात पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशी आणि प्रफुल हिंगे आमनेसामने येणार आहेत. पहिल्या सामन्यात प्रफुल हिंगेने वैभव सूर्यवंशीला गोल्डन डकवर बाद केलं होतं. तसेच सामना संपल्यानंतर त्याने समालोचकांशी बोलताना सांगितलं की, संघ सहकाऱ्यांना आधीच सांगितलं होतं की वैभवला पहिल्या चेंडूवर बाद करेन. पण विधानावरून वैभव सूर्यवंशीच्या प्रशिक्षकांचा संताप झाला होता. त्यामुळे वैभव सूर्यवंशीचे प्रशिक्षक मनीष ओझा 25 एप्रिलला होणाऱ्या सामन्याबाबत उत्सुक आहेत.

आयपीएल स्पर्धा सुरू असताना वैभव सूर्यवंशीचे प्रशिक्षक मनीष ओझा यांना हिंगेच्या विधानाबाबत आश्चर्य वाटलं होतं. तसेच त्यांनी टीव्ही 9 शी बोलताना आपला आक्षेप नोंदवला होता. त्यांनी सांगितलं होतं की, जर कोणता खेळाडू क्रिकेटमध्ये काही सांगून असं करत असेल तर ती मोठी बाब आहे. त्यामुळे आता 25 एप्रिलला काय होते ते पाहूयात. मनीष ओझा यांनी टीव्ही 9 शी बोलताना सांगितलं की, 25 एप्रिलला सर्व कामधंदे सोडून राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना पाहणार आहे. आशा आहे की वैभव सूर्यवंशी प्रफुल हिंगेचा समाचार घेईल. क्रिकेट काहीच सांगता येत नाही. 25 एप्रिलला जे काही होईल ते मोठं असेल, असं त्यांनी पुढे सांगितलं.

राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ मागच्या सामन्यात हैदराबादमध्ये भिडले होते. आता राजस्थान रॉयल्सचं होमग्राउंड असलेल्या जयपूरमध्ये हा सामना होणार आहे. वैभव सूर्यवंशीला या खेळपट्टीचा पूरेपूर अंदाज आहे. त्यामुळे प्रफुल हिंगेला गोलंदाजी करताना काळजी घ्यावी लागणार आहे. कारण पहिल्या चेंडूवर आणि पहिल्या षटकात वैभव भारी पडला तर पुढे कठीण आहे. कारण भल्याभल्या गोलंदाजांना त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे प्रफुल हिंगेसाठी ही अग्निपरीक्षा असणार आहे. त्यात पास होतो की नाही हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Todays Gold Rate: एकाच दिवसात सोन धाडकन आपटलं, काही तासात मोठा चमत्कर; 10 ग्रॅमचा भाव फक्त…
  • IPL 2026: दिल्ली कॅपिटल्सला दिलासा, प्लेऑफची स्पर्धा तीव्र असताना काढणार हुकूमाचा एक्का
  • Sharad Pawar Health Update | शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती उत्तम, निकटवर्तीयांची माहिती
  • स्वता:चा चित्रपट बघताना झोपलेला हा निर्माता, तरीही चित्रपट ठरला ब्लॉकबस्टर, थिएटरबाहेर व्हायची प्रचंड गर्दी
  • Up Election 2027 : उत्तर प्रदेश निवडणुकीसंदर्भात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची मोठी घोषणा, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in