• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Up Election 2027 : उत्तर प्रदेश निवडणुकीसंदर्भात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची मोठी घोषणा, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर

April 23, 2026 by admin Leave a Comment


उत्तर प्रदेशमध्ये पुढच्यावर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी आतापासून राजकीय हालचाली, मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. समाजवादी पार्टीने दादरी येथून मिशन 2027 ची घोषणा केली आहे. भाजपने सुद्धा आपले पत्ते उघड केले आहेत. भाजपने 2027 विधानसभा निवडणुकीसाठी आपला चेहरा निश्चित केला आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढली जाणार आहे. भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी यूपी निवडणुकीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन एका हिंदू न्यूज चॅनलला मुलाखत दिली. त्यात त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलय की, “योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार चालू आहे. त्यामुळेच निश्चितच ते चेहरा असतील”

नितीन नवीन यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने 2027 विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशात भाजपं सत्तेची हॅटट्रिक करेल असा विश्वास नितीन नवीन यांनी व्यक्त केला. यूपी आणि उत्तराखंडमध्ये सीएम योगी आणि धामी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील का? असा प्रश्न भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांना विचारण्यात आला.

वसुली आणि गुन्हेगारी होती ओळख

त्यावर उत्तर देताना नितीन नवीन म्हणाले की, “ते आमचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार चालू आहे. निश्चित तेच चेहरा असतील” यूपीच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले की, “उत्तर प्रदेश आधी वसुली आणि गुन्हेगारीसाठी ओळखलं जायचं. पण तेच यूपी आता चांगली कायदा सुव्यवस्था आणि एक्सप्रेस वे साठी ओळखलं जातं”

उत्तम प्रदेश बनवण्यासाठी काम

“पंतप्रधान आणि मुख्यमंत्री उत्तर प्रदेशला उत्तम प्रदेश बनवण्यासाठी काम करत आहेत. एकवेळ उत्तर प्रदेश गुन्हेगारीसाठी ओळखलं जायचं. जातीच्या आधारावर भ्रमित केलं जायचं. आज तेच उत्तर प्रदेश विकासासाठी ओळखलं जातय. एक्सप्रेस वे साठी, कायदा-सुव्यवस्थेसाठी ओळखतात” असं नितीन नवीन उत्तर प्रदेश संबंधीच्या प्रश्नावर म्हणाले.

15 वर्षानंतर भाजपने कधी सत्ता मिळवली?

“गुड गवर्नेंस, डेवलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रात उत्तर प्रदेश आज चांगलं काम करत आहे. सर्वसामान्य हेच पाहून मतदान करतात. आम्ही गरीबाची चिंता केली. पंतप्रधान अन्न योजनांपासून सर्व सरकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या. त्याशिवाय इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा प्रगती केली” असं नितीन नवीन म्हणाले. उत्तर प्रदेशात भाजपने 15 वर्षानंतर 2017 साली सत्ता मिळवली. त्यावेळी भाजपने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केला नव्हता. केशव प्रसाद मौर्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. अमित शाह पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. पीएम मोदी यांचं नाव आणि कामावर भाजपने उत्तर प्रदेशची निवडणूक लढवली व जिंकली. त्यानंतर योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पश्चिम बंगालमध्ये रेकॉर्डब्रेक 91 टक्के मतदान, भाजपाचं नशीब उजळणार का? बारामतीमध्ये किती मतदान?
  • साडी का नेसली नाहीस, गाऊन का घातला ? संतापलेल्या कृष्णाजीने बायकोला पेटवलं आणि…
  • आता फॅमिली ट्रिप होणार स्वस्त! रेनॉ ट्रायबर येतेय ‘डबल सीएनजी’ सिलेंडर आणि टर्बो इंजिनसह
  • Baramati | सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; बारामती पोटनिवडणुकीवर पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
  • Gunratna Sadavarte | MNS | गुणरत्न सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा कडाडून विरोध

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in