
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोमवारी मुंबईतील ब्रीचकॅण्डी रुग्णालय (Breach Candy Hospital) येथे नियमित तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीबाबत निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर निकटवर्तीयांनी दिलासा देणारी माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनंतर शरद पवार यांची प्रकृती स्थिर आणि समाधानकारक असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, त्यांना विश्रांती घेण्याचा तसेच काही काळ प्रवास टाळण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, त्यांच्या प्रकृतीबाबत राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात असताना, निकटवर्तीयांनी त्यांची तब्येत उत्तम असल्याचं सांगत अफवांना पूर्णविराम दिला आहे. तपासणीनंतर त्यांना त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी नेण्यात आलं असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते सध्या विश्रांती घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
Leave a Reply