• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rohit Sharma: पत्नीच्या हट्टापुढे हिटमॅनही क्लीन बोल्ड! रोहित-रितिकाचा व्हिडिओ व्हायरल

June 25, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज रोहित शर्मा याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला. क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीबद्दल रोहितला हा सन्मान देण्यात आला. शर्माची गणना जगातील सर्वोत्कृष्ट सलामीवीरांमध्ये केली जाते. इतकेच नाही, तर कर्णधार म्हणून त्याने भारतीय संघाला दोन आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. रोहितला या पुरस्कारासाठी आधीच नामांकन मिळाले होते. यापूर्वी एक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता, परंतु रोहितला त्यात उपस्थित राहता आले नाही. राष्ट्रपती भवनात आयोजित दुसऱ्या सत्कार समारंभात त्याचा सन्मान करण्यात आला. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण आता आणखी व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह पाहायला मिळत आहे.

टीम इंडियाचा स्टार खेळाडू रोहित शर्माला मंगळवारी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांचा एक खूपच गोड आणि मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मैदानावर मोठ्या गोलंदाजांना अनेकदा षटकार ठोकणारा रोहित शर्मा, पत्नीसमोर मात्र क्लिन बोल्ड झालेला पाहायला मिळाला.

रितिकाने प्रथम गाडीत रोहित शर्माशी बोलून आपल्या आवडत्या सीटवर बसण्याचा प्रेमाने आग्रह धरला. रोहित आपल्या पत्नीच्या या गोड इच्छेला नकार देऊ शकला नाही. हसतमुखाने हिटमॅन गाडीतून उतरला आणि त्याने आपली सीट सोडली. लगेचच, रितिका आनंदाने रोहितच्या आवडत्या सीटवर बसली. चाहत्यांना या दोघांमधील ही गंमत आणि रोहितने आपल्या पत्नीसाठी केलेली ही कृती खूप आवडत आहे.

या कारमधील व्हिडिओ व्यतिरिक्त, या स्टार जोडप्याची आणखी एक सुंदर झलक राष्ट्रपती भवनात पाहायला मिळाली. रोहित शर्माला देशाचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या पद्मश्रीने अधिकृतपणे गौरविण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्याला हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केला. जेव्हा रोहित शर्माचे नाव पुकारले गेले आणि तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुढे आला, तेव्हा प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या त्याची पत्नी रितिका सजदेहच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद अश्रू पाहायला मिळाले. तात्काळ आपल्या जागेवरून उठली आणि प्रचंड अभिमानाने आपल्या पतीसाठी टाळ्या वाजवू लागली. रितिकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Shugar Rate : साखरेच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी सरकारने अचानक बदलला हा नियम
  • Housewife ITR Rules: गृहिणींनाही भरावा लागणार कर? जाणून घ्या ते नियम जे 99% लोकांना माहीत नाहीत
  • चौथी पासांसाठी खुश खबर, थेट सरकारी नोकरी, मुंबई हायकोर्टातच व्हा भरती, पटापट करा अर्ज
  • नाशिकच्या कुंभमेळ्याच्या खर्चातील 0.1 टक्के…; संजय राऊतांकडून न्यायमूर्ती वराळेंचं कौतुक, पण मनातलंही बोलूनही दाखवलं
  • Bigg Boss फेम भजन सम्राट वयाच्या 73 व्या वर्षी उरकणार चौथं लग्न? म्हणाले, ‘3 लग्न करण्यास मनाई नाही, पण बायका ठेवण्यास…’,

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in