• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Raqesh Bapat: ‘नवरी मिळे हिटलरला’च्या तुफान यशानंतर राकेश बापटची नवी मालिका; साकारणार ही भूमिका

September 1, 2026 by admin Leave a Comment


मराठी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणारा अभिनेता राकेश बापट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतील एजेच्या भूमिकेनं प्रेक्षकांची पसंती मिळवल्यानंतर आता राकेश एका नव्या आणि दमदार भूमिकेत दिसणार आहे. राकेशच्या वाढदिवसानिमित्त स्टार प्रवाह वाहिनीने त्याच्या चाहत्यांना खास सरप्राईज देत नव्या मालिकेची घोषणा केली आहे. ‘तुझ्याकडे तुला मागणे’ असं या नव्या मालिकेचं नाव असून, राकेश या मालिकेत अत्यंत प्रभावी आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व साकारणार आहे. त्यामुळे राकेशच्या नव्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.

अभिराम जहांगीरदारनंतर आता साकारणार अभिमान सरदेसाई

या मालिकेत राकेश बापटच्या पात्राचं नाव अभिमान सरदेसाई असणार आहे. अभिमान हा केवळ यशस्वी उद्योजक नसून राजकारणातही सक्रिय असलेला नेता आहे. त्याची प्रतिमा अतिशय प्रामाणिक आणि स्वच्छ आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीच्या आयुष्यातील उद्योजक आणि राजकीय नेता अशा दोन्ही बाजू राकेश आपल्या अभिनयातून कशा प्रकारे उलगडणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राकेशने यापूर्वीही विविध प्रकारच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मात्र, ‘तुझ्याकडे तुला मागणे’मधील अभिमान सरदेसाई हे पात्र त्याच्या कारकिर्दीतील वेगळ्या धाटणीचं ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या भूमिकेत त्याचा रुबाबदार अंदाज आणि व्यक्तिमत्त्वाची वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

मालिकेचा प्रोमो-

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

राकेश बापटचा वाढदिवस त्याच्यासाठी यंदा खास ठरला आहे. वाढदिवसाच्याच दिवशी स्टार प्रवाहकडून त्याच्या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. त्यामुळे राकेशच्या चाहत्यांसाठीही हा दिवस खास ठरला. नव्या मालिकेची पहिली झलक समोर आल्यानंतर सोशल मीडियावरही या मालिकेबद्दल चर्चा सुरू झाली आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये राकेश ‘सिंगल फादर’च्या भूमिकेत दिसत आहे. ‘ईशानचा बाबा ही मीच आणि आई सुद्धा मीच,’ असं तो म्हणतोय.

अभिमान सरदेसाईच्या आयुष्यातील नेमकी कथा काय असेल? त्याचा व्यवसाय आणि राजकारण यांचा परस्परांशी काय संबंध असेल? तसेच त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कोणते चढ-उतार येणार, याची उत्सुकता आता वाढली आहे. त्यामुळे ‘तुझ्याकडे तुला मागणे’ ही मालिका राकेश बापटच्या चाहत्यांसाठी नक्कीच लक्षवेधी ठरणार आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Todays Gold Rate: Import Duty कमी होणार अशी चर्चा रंगताच किमती धाडकन कोसळल्या, सोन्याचा आजचा भाव किती?
  • Rajat Bedi : वयाच्या 51 व्या रजत बेदीची नवी सुरुवात, म्हणाला, ‘माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी सुद्धा…’
  • Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवीन व्हिडिओ, जनतेला पुन्हा मोठे आवाहन, कशाच्या दिल्या शुभेच्छा?
  • Raqesh Bapat: ‘नवरी मिळे हिटलरला’च्या तुफान यशानंतर राकेश बापटची नवी मालिका; साकारणार ही भूमिका
  • जन्मतःच नवजात मुलाची सलमान सारखी ताकद, स्टाइल बघून डॉक्टर नर्स हैराण…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in