• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवीन व्हिडिओ, जनतेला पुन्हा मोठे आवाहन, कशाच्या दिल्या शुभेच्छा?

September 1, 2026 by admin Leave a Comment


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. त्यांच्या या नवीन व्हिडिओने सोशल मीडियावर तुफान आले आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या दमदार कामगिरीचा उल्लेख केला आहे. तर जनतेला पुन्हा मोठे आवाहन केले आहे. सीजेपी आंदोलनानंतर पीएम मोदी हे छोटे व्हिडिओ तयार करून तरुणाईला साद घालताना दिसत आहे. त्यांच्या व्हिडिओला तरुणाईतून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे समोर आले आहे. आताही त्यांनी संवादासाठी नवीन व्हिडिओ माध्यम म्हणून निवडला आहे. या व्हिडिओत त्यांनी देशाच्या प्रगतीवर भाष्य केले आहे. तसेच विरोधकांवर तोंडसुख घेतले आहे.

विकासाचा दर 7.08 टक्के

जग हे संकटांनी घेरल्या गेले आहे. पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. 2020 च्या कोरोनापासून ते आतापर्यंत कुठेही स्थिरता दिसत नाही. इतके संकट असतानाही भारत वेगाने प्रगती करत आहे. दुसरीकडे भारतातील काही लोकं निराशेच्या गर्तेत अडकलेले आहे. खोटेपणा पसरवत काही लोक ही निराश वाढवत आहेत. या सर्व संकटांवर मात करत, अडथळे दूर करत देशाने 7.08 टक्क्यांचा विकास दर गाठला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत भारताने विकासाचा दर GDP मध्ये वाढ केल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला विकासाचा दर कायम ठेवायचा आहे. आपल्याला प्रगतीत सातत्य ठेवायचे आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

7.8% growth.

Strong numbers.

Even stronger confidence. pic.twitter.com/ZVPpnAXrVU

— Narendra Modi (@narendramodi) September 1, 2026

नागरिकांना काय केले आवाहन?

हा विकास दर कायम ठेवण्यासाठी आत्मनिर्भर भारत असणे आवश्यक आहे. स्वदेशीचा मंत्र, व्होकल फॉर लोकल, परदेशी यात्रेवर जाऊ नका. फिरण्यासाठी, पर्यटनासाठी परदेशात जात असाल तर जाऊ नका, असे आवाहन पीएम मोदी यांनी केले. परदेशात लग्न करत असाल तर करू नका. मेड इन इंडियाचा मंत्र जपा. जर गरज नसेल तर सोने सुद्धा खरेदी करु नका असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी जनतेला केले आहे. आपण जितका जास्त स्वदेशीचा मंत्र जपू आत्मनिर्भर भारताचा संकल्प जपू तेव्हा मला विश्वास आहे की, स्वातंत्र्याला जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा तरुण पिढीच्या हाती आपण विकसीत भारत सोपवू, असे मोदी म्हणाले. तरुण पिढीची स्वप्न आज आपण आपल्या श्रमातून साकार करुयात. देशातील नागरिकांनी आता पुरुषार्थ करण्यात कुठेही कमी पडू नये असे आवाहन मोदी यांनी जनतेला केले. आमची नीती योग्य आहे आणि नियतही स्वच्छ आहे. 140 कोटी जनतेची शक्ती आज एकजूट होऊन देशाला नवीन उंचीवर घेऊन जाईल. चला आनंदही साजर करूयात आणि संकल्पही करूयात. संकल्प सिद्ध करण्यासाठी माझ्यासोबत चला असे आवाहन करत मोदी यांनी जनतेला या नवीन विकास दराबाबत आणि देशाच्या प्रगतीबाबत खूप खूप शुभेच्छा दिल्या.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीवर भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बहिष्कार, समोर आलं मोठं कारण
  • खतरनाक सीरिज, एकदा सुरुवात केली तर शेवटपर्यंत बघतात लोक, प्रत्येक भाग सुपरहिट, फ्रीमध्ये बघत आहेत लोक
  • MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
  • देशी ब्रँडची युकेत धमाकेदार एण्ट्री, लाँच केला 5000mAh बॅटरी आणि 50MP सेल्फी कॅमेरा फोन
  • अभिजीत दीपकेंचा सर्वात मोठा विजय, सरन्यायाधीशांनी दाखवली पॉवर, सीजेपीची दुसरी मागणी मान्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in