
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज बेदी कुटुंबाचा समृद्ध वारसा आता मराठी सिनेमात पाहायला मिळणार आहे. रजत बेदी मराठी ‘बंधू’ (Bandhu) सिनेमातून सिनेविश्वात पदार्पण करणार आहे.
अभिनेत्याच्या वडिलांनी आणि आजोबांनी देखील सिनेविश्वासाठी मोठं योगदान दिलं आहे.अशात नव्या प्रवासाबद्दल अभिनेता म्हणाला, 'बेदी कुटुंबासाठी भारतीय चित्रपटसृष्टी ही केवळ एक इंडस्ट्री नाही. चित्रपटसृष्टी आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे…
पुढे अभिनेता म्हणाला, माझ्या वडिलांपासून आणि आजोबांपासून मिळालेला हा वारसा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आता मराठी सिनेविश्वात पदार्पण करत आहे. हा माझ्या आयुष्यातील नवा अध्याय सुरु आहे…
मराठी सिनेमांबद्दल रजत म्हणाला की, 'दर्जेदार कथांसाठी मराठी सिनेमांची ओळख होते. त्यामुळे बंधू सिनेमाचा भाग असणं माझ्यासाठी खास आहे… प्रेक्षक माझ्या नव्या भूमिकेचं आणि सिनेमाचं स्वीकार करतील.', अभिनेता कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.
रजत याच्याबद्दल सांगायचं झालं तर, 'कोई मिल गया' या सिनेमानंतर अभिनेत्याच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. अभिनेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेता कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो.




Leave a Reply