• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vidyananda Bapat : डीजेला विरोध करणारे पुण्यातील विद्यानंद बापट नेमके कोण? काम काय करतात? शिक्षण वाचून चकित व्हाल!

September 1, 2026 by admin Leave a Comment


पुण्यातील तासनतास चालणाऱ्या गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीच्या विरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल आहेत. त्यांच्या मुलाखतीत सलग मराठी बोलणे लोकांना आवडू लागले आहे. विशेष म्हणजे ते बोलताना जराही कुठे अडखळत नाहीत. त्यामुळे त्यांचे बोलणे एआयचे तंत्रज्ञान आहे की असा लोकांना संशय येत आहे. मात्र, यात एआयची कोणताही चमत्कार नसून विद्यानंद बापट यांचा हा ओरिजनल आत्मसात केलेला गुण असल्याचे त्यांच्या बोलताना जाणवते. तर डीजे मिरवणूकीला विरोध करुन सर्वांना भिडणारे विद्यानंद बापट नेमके शिकले किती आहेत. याची माहिती त्यांनी स्वत:च दिली आहे.

पुण्यातील गणेश उत्सवाचा मिरवणूकातील डिजे दणदणाटाला विरोध करुन प्रसिद्धीच्या झोतात आलेले आणि पुण्याच्या नारायण पेठेतील विद्यानंद बापट यांच्या जिभेवर मराठी भाषा जणू घसरगुंडी खेळत असावी असे त्यांचे बोलणे ब्रेथलेस सुरु असते. त्यांच्या या बोलण्यामुळे त्यांची तुलना सध्या शशी थरुर यांच्याशी केली जात आहे. शशी थरुर यांच्या जीभेवर इंग्रजी भाषा तर विद्यानंद बापट यांच्या जिभेवर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा सुखनैव नांदत असाव्यात अशी त्यांची अस्खलित मराठी हल्लीच्या इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मराठी मुलांच्याही डोक्यावरुन जाईल अशी आहे.

म्हणून डिजे मिरवणूकींना विरोध

डिजेला विरोध करण्यामागे त्यांनी नारायण पेठेत आपण राहात असल्याने डीजे मिरवणूकीचा त्रास आपल्या होतो. मात्र, नदी किनारी राहणाऱ्या लोकांना तो अधिक होतो. आपण थोडे आत राहात असल्याने आपल्या थोडा कमी त्रास होतो असे विद्यानंद बापट सांगतात. विद्यानंद बापट मुळचे पुण्याचे नाहीत ते रत्नागिरीचे रहाणार असून ते पुण्यात सध्या राहातात. त्यांचे शिक्षण बीकॉम पर्यंत झाले असून ते एका बीपीओमध्ये काम करतात. केवळ एक जागरुक नागरिक म्हणून आपण डिजे मिरवणूकींना विरोध करत असल्याचे बापट सांगतात. उत्सवाच्या काळात  दहा दिवस आम्हाला सार्वजनिक वाहतूकीला मुकावे लागते असेही ते सांगतात.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आमच्या आंतरवालीत रक्ताचा चिखल केला होता… जरांगे पाटील भावुक, आंदोलनस्थळी नेमकं काय घडलं?
  • Vidyananda Bapat : डीजेला विरोध करणारे पुण्यातील विद्यानंद बापट नेमके कोण? काम काय करतात? शिक्षण वाचून चकित व्हाल!
  • महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात अनुकंपा धोरण लागू , सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसदारांना नोकरी
  • 2 September 2026 Horoscope : तुमचं आयुष्य बदलून जाणार, 2 सप्टेंबरला या राशींसोबत होणार चमत्कार!
  • महाराष्ट्राच्या ‘शशी थरुर’ने तुकाराम मुंढेंबद्दल हे काय सांगितलं? असं बोलून गेले की… त्या शब्दांची तुफान चर्चा!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in