• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात अनुकंपा धोरण लागू , सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसदारांना नोकरी

September 1, 2026 by admin Leave a Comment


उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री म्हणून महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात अनुकंपा नियुक्ती धोरण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पात्र वारसांना संबंधित अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याचे धोरण आहे, मात्र, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ हे स्वायत्त मंडळ असल्याने या मंडळाला हा निर्णय लागू होत नव्हता. आज हा निर्णय लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच त्यासाठीचा शासनादेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात अनुकंपा तत्व लागू करण्यात आले आहे.

या निर्णयानुसार, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या सेवेत असताना कोणीही कर्मचारी किंवा अधिकारी यांचं निधन झाल्यास त्यांच्या पात्र वारसांना अनुकंपा धोरणानुसार शासकीय सेवेत त्यांच्या शैक्षणिक पात्रनेनुसार गट क किंवा ड मध्ये वक्फ मंडळात नियुक्ती मिळू शकेल. त्यासाठी पात्रता तारीख २१.०९.२०१७ अशी निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच या तारखेस किंवा त्यानंतर सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना मंडळात नियुक्ती मिळेल, तसंच ३१.१२.२००१ नंतर अशा कर्मचाऱ्यांना तिसरे अपत्य झालेले असल्यास त्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा धोरण लागू होणार नाही. यासाठीचा शासन आदेश शासकीय संकेतस्थळावर जारी करण्यात आला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vidyananda Bapat : डीजेला विरोध करणारे पुण्यातील विद्यानंद बापट नेमके कोण? काम काय करतात? शिक्षण वाचून चकित व्हाल!
  • महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात अनुकंपा धोरण लागू , सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसदारांना नोकरी
  • 2 September 2026 Horoscope : तुमचं आयुष्य बदलून जाणार, 2 सप्टेंबरला या राशींसोबत होणार चमत्कार!
  • महाराष्ट्राच्या ‘शशी थरुर’ने तुकाराम मुंढेंबद्दल हे काय सांगितलं? असं बोलून गेले की… त्या शब्दांची तुफान चर्चा!
  • अजब पुण्यातील गजब प्रकार! दोन मुलांनी आई-वडिलांना मार मार मारलं; भर रस्त्यात…व्हिडीओ पाहून धक्काच बसेल!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in