
Pune News : पुणे जिल्ह्यात नेहमीच काहीतरी घडत असतं. या जिल्ह्यात गेल्या काही काळात अनेक मोठे क्राईम घडले आहेत. खुनाच्या घटनांत तर चांगलीच वाढ झालेली आहे. याच पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्या आई-विडिलांनी लहानपणी संस्कार केले, जीवापाड जपलं, आयुष्यभर कष्ट करून मोठं केलं, त्याच आई-वडिलांना दोन भावांनी दांडक्याने मारहाण केली आहे. या घटनेचा हादरवणारा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ही दुर्दैवी घटना पाहून सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय.
नेमकं काय घडलं?
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आई- वडील रोडवर पडल्याचे दिसत आहेत. त्यांच्या मागे एक पांढऱ्या रंगाची कार उभी आहे. समोर या दाम्पत्यांची दोन मुलं उभी आहेत. या दोघांपैकी एकाच्या हातात काठी दिसत आहे. याच काठीने तो आपल्या वडिलांना मारताना दिसतोय. तर दुसरीकडे बाजूला बसलेली आई आपल्या मुलांना ‘माझ्या नवऱ्याला मारू नका रे’ अशी विनवणी करताना दिसत आहेत.
वडिलांना मारण्यामागचं नेमकं कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार मुलांनी आपल्या बापाला जमिनीच्या वादातून मारलं आहे. आईच्या नावावर असलेली जमीन विकल्याने मुलांनी वडिलांना रागाच्या भरात मारल्याचं सांगितलं जातंय. इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथील ही घटना आहे. ही घटना घडल्यानंतर वडिलांनी आपल्या मुलांविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आपल्या आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या दोन मुलांची नावे संजय तुकाराम राऊत आणि राजेंद्र तुकाराम राऊत अशी आहेत.
Leave a Reply