• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ranveer Singh: बंदी रणवीर सिंहवर , पण 300 लोकांची होरपळ, कारवाई मागे घेणार?

May 29, 2026 by admin Leave a Comment


Ranveer Singh FWICE: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह हा गेल्या काही दिवसांपासून ‘डॉन 3’ शी संबंधित वादाने चर्चेत आला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने (FWICE) ने त्याच्यावर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. पण बॉलिवूडमध्ये या कारावाईवरूनच दोन गट पडल्याचे समोर आले आहे. चित्रपट निर्माता संजय गुप्ता याने रणवीर सिंह याच्यावरील बंदीवर सवाल उपस्थित केला आहे. त्याने समाज माध्यमावर एक पोस्ट करत त्याची नाराजी व्यक्त केली आहे. या बंदीचा फटका केवळ रणवीर सिंह यालाचा बसला असे नाही तर चित्रपटसृष्टीतील अनेक छोटे कलाकार आणि कामगारांवर पडला आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचा दावा करण्यात येत आहे. तर या कारवाईविषयी लवकर तोडगा काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

FWICEने रणवीर सिंहविरोधात असहकार नियम जाहीर केले आहेत. ‘डॉन 3’ सिनेमाचा निर्माता फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी रणवीरविरोधात फेडरेशनकडे तक्रार केली होती. रणवीरने हा चित्रपट अचानक सोडल्याने त्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा आणि आर्थिक नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले होते. रणवीरच्या कृतीमुळे निर्मात्यांचे जवळपास 45 कोटी रुपये पाण्यात गेल्याचा दावा करण्यात आला आहे.

संजय गुप्ता यांची नाराजी

संजय गुप्ता यांनी या सर्व प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सोशळ मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. त्यानुसार, जेव्हा एखादा मोठा स्टार चित्रपटाचे शुटिंग करतो. तेव्हा सेटवर जवळपास 300 लोकांच्या हाताला रोजगार मिळतो. यामध्ये स्पॉट बॉय, लाइटमॅन, कॅमरा टीम, मेकअप आर्टिस्ट, कॉस्ट्यूम स्टाफ आणि इतर अनेक कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. जर एखाद्या अभिनेत्याला बंदी घातली तरी केवळ त्या अभिनेत्याचे काम थांबते असे नाही तर सेटवरील त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळते. हे कर्मचारी चित्रपट उद्योगावर अवलंबून असतात. याकडे त्यांनी लक्ष वेधले. बड्या स्टारला थांबवण्याचा तितका मोठा परिणाम होत नाही, पण सेटवर काम करणाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न तयार होतो. अनेक कर्मचारी बेरोजगार होतात. त्यामुळे असे निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावेत असा अप्रत्यक्ष सल्लाच त्यांनी दिल्याचे मानले जात आहे.

या वादावर FWICE चे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी स्पष्टीकरण दिले आहे. IANS ला दिलेल्या माहितीनुसार रणवीर सिंह याने शुटिंग सुरू होण्याच्या अगदी तीन आठवड्यापूर्वी चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला. तोपर्यंत या चित्रपटाच्या शुटिंगची तयारी जवफास पूर्ण झाली होती. शुटिंगची ठिकाणी निश्चित झाली होती. हॉटेल बुक करण्यात आली होती. तर शुटिंगची परवानगी सुद्धा घेण्यात आली होती, असे ते म्हणाले. या बिग बजेट चित्रपटासाठी यापूर्वीच मोठा पैसा खर्च झाला आहे. अशावेळी रणवीर सिंह यांनी अचानक चित्रपट सोडल्याने निर्मात्यांचे मोठे नुकसान झाले. हा फटका सर्वच युनिटला बसला. फेडरेशनने बंदीचा निर्णय काही अचानक घेतलेला नाही. तर बंदी घालण्यापूर्वी रणवीर सिंह याच्याशी बोलण्याचा आणि चर्चा करण्याचा प्रयत्न झाला. पण त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर बंदीचा निर्णय घेण्यात आला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सरकारने अचानक घेतला मोठा निर्णय, साखरेच्या भाववाढीनंतर आता…चार वर्षांनी काय घडलं?
  • अभिजीत दिपके यांचा लेटरबॉम्ब! काय केल्या मागण्या? टेन्शन वाढलं, आता कुणाचा राजीनामा घेणार?
  • रेल्वे रुळांमध्ये मुद्दाम हे अंतर का ठेवले जाते? कारण वाचून व्हाल थक्क
  • Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका, 4 निर्णय खूप महत्त्वाचे, विद्यार्थ्यांना सर्वात मोठं गिफ्ट!
  • रॉयल एनफील्डचा धमाका! आयकॉनिक Continental GT 650 नवीन फीचर्ससह लाँच; जाणून घ्या किंमत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in