• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Lionel Messi World Record: लियोनल मेस्सीने विश्वविक्रम रचला, फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत गोल विक्रम

June 23, 2026 by admin Leave a Comment


अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सी सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. पहिल्या सामन्यात त्याने गोलची हॅटट्रीक नोंदवली होती. आता मेस्सीने ऑस्ट्रियाविरुद्ध गोल मारत फिफा वर्ल्डकप स्पर्धेत विक्रम केला आहे. (PC-GETTY IMAGES)

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत 28 सामने खेळत मेस्सीने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मेस्सीने या स्पर्धेत एकूण 17 गोल मारले असून जर्मनीचा दिग्गज फुटबॉलपटू मिरास्लोव क्लोसचा विक्रम मोडला. त्याने या स्पर्धेत एकूण 16 गोल मारले होते. त्यानंतर ब्राझीलच्या रोनाल्डोच्या नावावर 15 गोल आहे. (PC-GETTY IMAGES)

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक गोल मारण्याच्या शर्यतीत मेस्सीसोबत फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू किलियन एम्बाप्पे आहे. फ्रान्सने इराकला 3-0 ने हरवले, यात कर्णधार किलियन एम्बाप्पेने दोन गोल केले. या दोन गोलांसह एम्बाप्पेने जर्मनीच्यामिरास्लोव क्लोसचा 16 गोलांच्या विक्रमाची बरोबरी केली. त्यामुळे मेस्सीच्या जवळ येण्याची आणि त्याचा विक्रम मोडण्याची संधी आहे. (PC-GETTY IMAGES)

लियोनल मेस्सीने आपल्या फुटबॉल कारकि‍र्दीत फिफा वर्ल्डकप जिंकला आहे. तसेच या स्पर्धेत सर्वाधिक गोल मारणारा खेळाडू ठरला आहे. या शिवाय सर्वाधिक बॅलन डी ऑर पुरस्कार जिंकण्याचा मान मिळवला आहे. (PC-GETTY IMAGES)

ऑस्ट्रियाविरुद्ध मेस्सीने एक पेनल्टी मिस केली. त्यामुळे त्याच्या नााववर एक नकोसा विक्रमही रचला गेला आहे. सलग तीन वर्ल्डकप स्पर्धेत पेनल्टी मिस करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. (PC-GETTY IMAGES)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हजारो वर्षांपूर्वी फ्रिज नसताना लोक अन्न कसे सुरक्षित ठेवत होते? पद्धत ऐकून तुम्ही व्हाल हैराण
  • भीक मागत मागत मृत्यू… घराची झडती घेताच सापडल्या 30 पोती नोटा अन् नाणी, एकूण खजिना… सर्वांनाच बसला धक्का
  • स्पर्धेच्या युगात मुलांच्या उज्वल भविष्य घडवण्यासाठी आई – वडिलांनी ही मूल्य जपलीच पाहिजे
  • युट्युब गेमचा २४ तासांचा खतरनाक चॅलेंज, घरातून दोन लहान मुले गुपचुप पळाली, नंतर काय झाले ?
  • Kriti Sanon: रक्षाबंधनच्या जाहिरातीवरून झालेल्या वादावर अखेर क्रिती सनॉनने सोडलं मौन; महिलांनी कसे कपडे घालावेत हे..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in