• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एकनाथ शिंदेंनी पेटारा उघडला, ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना मोठं गिफ्ट, तातडीने विकास निधी…

June 23, 2026 by admin Leave a Comment


Eknath Shinde : ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशाचा जाहीर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मतदारसंघाचा विकास आणि विकासनिधी या कारणामुळेच आम्ही पक्षांतर करत आहोत, असे या सहा खासदारांकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, आता खासदारांनी प्रक्षप्रवेश करताच एकनाथ शिंदे यांनी पेटारा उघडला आहे. जे खासदार पक्षात आलेले आहेत, त्यांना भरघोस विकासनिधी दिला जाईल, असे शिंदे यांनी सांगितले आहे.

मला आताच दोन खासदार भेटले

एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी बोलताना आम्ही कोणतंही ऑपरेशन अर्धवट सोडत नाही. खासदारांचं ऑपरेशन टायगर यशस्वी झालं आहे. सगळ्या कायदेशीर, घटनात्मक प्रकिया पूर्ण झालेल्या आहेत, असे शिंदे यांनी सांगितले. सगळेच सहा खासदार आनंदी आहेत. मला आताच दोन खासदार भेटले आहेत. ते आता मूळ शिवसेनेत आले आहेत, असे म्हणत शिंदे यांनी ऑपरेशन टायगर यशस्वी ठरल्याचा पुनरुच्चार केला.

आलेल्या खासदारांच्या विभागात वेगाने विकास होईल

सहा खासदार आमच्या परिवारात आले आहेत. अगोदर आमच्याकडे सात खासदार होते. आता सहा खासदार आले आहेत. आमची टीम आता मोठी झाली आहे. राज्यसभेचे दोन खासदार आहेत. आता शिवसेना अधिक बळकट होईल. आलेल्या खासदारांच्या विभागात वेगाने विकास होईल, असा विश्वानस एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

निधी देण्याची तत्काळ सूचना केली

आजच आम्ही काही विभागांचा निधी, निधीचे प्रस्ताव आणायला सांगितले आहे. काही निधी त्यांना तत्काळ देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. मतदारसंघांचा विकास हाच आलेल्या खासदारांचा अजेंडा होता. या अजेंड्याला आम्ही आता सुरुवात केली आहे. एनडीएचीही ताकद वाढलेली आहे. डबल इंजिनच्या सरकारमध्ये हे सहा खासदार आले आहेत, असे म्हणत बंडखोरी केलेल्या खासदारांना आता विकासनिधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल, असे शिंदे यांनी सांगितले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in