• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ramayana Trailer: इंटरनेटवर फक्त ‘रामायण’चा बोलबाला, ट्रेलर प्रदर्शित होताच 5 गोष्टींनी घातला धुमाकूळ

July 31, 2026 by admin Leave a Comment


Ramayana Trailer Review: भारतीय सिनेविश्वात सध्या एकाच गोष्टीची चर्चा रंगली आहे आणि ती म्हणजे ‘रामायण’ सिनेमेमाची… सिनेमाचा ट्रेलर 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार होता, पण काही कारणांमुळे सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होऊ शकला नाही. पण ट्रेलर प्रदर्शित होताच सर्वत्र फक्त आणि फक्त ‘रामायण’ सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा रंगली आहे. तर या 5 गोष्टींमुळे सिनेमाचा ट्रेलर चर्चेत आहे. सांगायचं झालं तर, हा केवळ एक ट्रेलर नाही, तर एक व्हिज्युअल मास्टरपीस असून जेव्हा आपला ‘रॉकिंग स्टार’ यश ‘रावण’च्या भूमिकेत गर्जना करतो, तेव्हा चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचतो.

या 5 गोष्टींमुळे सिनेमाचा ट्रेलर ठरतोय खास

रावणाच्या रुपातील यशची ‘मॉन्स्टर’ एन्ट्री…

सिनेमाच्या ट्रेलरचे सर्वात मोठं आकर्षण म्हणजे ‘लंकेश्वर’च्या भूमिकेतील यशचा लूक. “अब तीनों लोक रावण-राज्य देखेंगे” हा डायलॉग म्हणताना जेव्हा यश पडद्यावर दिसतो, तेव्हा अंगावर शहारे येतात. सोन्याच्या लंकेत लाखो सैनिकांच्या फौजेसमोर रावणाच्या रूपात गर्जना करणारा यशचा लूक आणि त्याचा दरारा खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना भुरळ घालणारा आहे. यापूर्वी नायक म्हणून लोकांची मने जिंकणाऱ्या ‘रॉकी भाई’ने जगातील सर्वात मोठ्या खलनायकाच्या भूमिकेत कोणता चमत्कार घडवला असेल, याबद्दलची उत्सुकता आता द्विगुणित झाली आहे.

महाविष्णूचा अवतार जो डोळ्यांना अत्यंत सुखद वाटतो

सिनेमाचे व्हिज्युअल पाहून असं वाटतं की VFX असायला हवं तर असं… जेव्हा पृथ्वीवर पाप वाढतो, तेव्हा श्रीमननारायण यांचं आगमन होतं… हे सीन देखील उत्तम रित्या चित्रित करण्यात आले आहेत. शेषनागावर झोपलेले भगवान विष्णू… हातात शंख आणि कमळाचं फूल… हा सीन प्रेक्षकांना एका वेगळ्याच जगात घेऊन जातो… यामध्ये हॉलिवूडच्या टेक्नोलॉजीचा वापर झाल्याचं स्पष्ट दिसत आहे.

शांत स्वरुपातील राम आणि चारही बाजूला कमळाचं फूल…

रणबीर कपूर याने श्रीरामाच्या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिला आहे. मोठ्या, उमललेल्या कमळाच्या पाकळ्यांनी वेढलेलं असताना अभिनेता ध्यानात मग्न असलेलं दृश्य अतिशय नयनरम्य आहे. रामाची शांतता आणि आंतरिक सामर्थ्य दर्शवणारा हा प्रसंग दिग्दर्शकाच्या कल्पकतेचा उत्तम नमुना ठरतो. लक्ष्मणच्या भूमिकेत रवी दुबे देखील अत्यंत प्रभावी आणि भारदस्त वाटतात.

माता सीता यांच्या हातात तलवार! कथेतील वेगळा ट्विस्ट

सीतेकडे सर्वजण एक सौम्य स्वभावाची देवी म्हणून पाहतात. मात्र, या सिनेमात साई पल्लवी हिने साकारलेली ‘सीता’ केवळ शांत आणि संयमी नाही, तर एक योद्ध्याही आहे! ट्रेलरमध्ये साई पल्लवीला तलवार चालवताना दाखवण्यात आलं आहे आणि हे दृश्य पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे. पडद्यावर सीतेचे सामर्थ्यशाली रूप मांडण्याचा हा एक नाविन्यपूर्ण प्रयत्न असल्याचं दिसून येत आहे.

ब्रह्मास्त्रासह राम-युगाचा उदय!

ट्रेलरचा अंत एक मास डायलॉग आणि जबरदस्त सीनने होत आहे… “ये रामयुग का आरंभ है” असं म्हणत जेव्हा राम ब्रह्मास्त्र चालवतात, तो सीन अंगावर काटे आणणारा आहे… पंचमहाभूतांचे एकत्रित दर्शन घडवणाहा सीन चित्रपटगृहात प्रेक्षकांना नक्कीच मंत्रमुग्ध करेल.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
  • ज्याची भीती होती तेच घडलं, यशस्वी जयस्वालवर ICC ची मोठी कारवाई, करिअरवर लागला डाग
  • हिरव्यागर्द झाडीतून नागमोडी वळणं घेताना दिसली वंदेभारत एक्स्प्रेस, मनमोहक बर्ड आय व्यूह व्हिडीओ व्हायरल
  • महायुतीची ‘मैत्री राज्यात, पुण्यात नाही’, निधी वाटपावरून राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे धाव, सुनील टिंगरेंचे पत्र
  • IND vs SL 2nd Test : ऋषभ पंतने शुबमन गिलचा रेकॉर्ड मोडला, या बाबतीत निघून गेला सर्वांच्या पुढे

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in